हिंदू महासभेच्या नेत्याच्या हत्येत नवा ट्विस्ट,आरोपींचा ठावठिकाणा पाकिस्तानच्या सीमेजवळ

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या मारेकऱ्यांना पकडून देण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडीच लाखांचं इनाम जाहीर केलं आहे. अश्फाक आणि मोइनुद्दीन पठाण या दोन आरोपींना पकडण्यासाठी हे इनाम आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 01:11 PM IST

हिंदू महासभेच्या नेत्याच्या हत्येत नवा ट्विस्ट,आरोपींचा ठावठिकाणा पाकिस्तानच्या सीमेजवळ

लखनऊ, 21 ऑक्टोबर : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या मारेकऱ्यांना पकडून देण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडीच लाखांचं इनाम जाहीर केलं आहे. अश्फाक आणि मोइनुद्दीन पठाण या दोन आरोपींना पकडण्यासाठी हे इनाम आहे.

कमलेश तिवारी हत्याकांडामधल्या 3 संशयितांना गुजरात एटीएस ने ताब्यात घेतलं होतं. आता उत्तर प्रदेश पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. त्याचबरोबर आणखी दोन संशयित शाहजहाँपूरमध्ये दिसल्याची खबर आहे.

हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची 18 ऑक्टोबरला लखनऊच्या त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातले मुख्य आरोपी शेख अशफाक हुसेन आणि पठाण मोइनुद्दीन अहमद हे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. या दोघांचा शेवटचा ठावठिकाणा हरियाणाच्या अंबालाजवळ मिळाला आहे. हे ठिकाण वाघा बॉर्डरपासून 285 किमी दूर आहे.

(हेही वाचा : PMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये)

कमलेश तिवारी हत्याकांड प्रकरणी गुजरातमधल्या सुरतमधून 3 आणि उत्तर प्रदेशातून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात बिजनौरच्या दोन मौलानांचा यामध्ये हात आहे का याबदद्लही तपास सुरू आहे. या दोन मौलानांनी कमलेश तिवारी यांची हत्या करण्यासाठी दीड कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती.

Loading...

==================================================================================

मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री गेले सायकलवर, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...