काँग्रेस सरकार उघडणार फक्त महिलांसाठी खास दारूची दुकानं

काँग्रेस सरकार उघडणार फक्त महिलांसाठी खास दारूची दुकानं

महिलांसाठी वेगळं दारूची सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने घेतला आहे. महिलांना कोणत्याही अडथळ्याशिवाय दारू खरेदी करता यावी यासाठी कमलनाथ सरकारने हा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

भोपाळ, 27 फेब्रुवारी : फक्त महिलांसाठी असणारं वेगळं दारूचं सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने घेतला आहे. महिलांना कोणत्याही अडथळ्याशिवाय दारू खरेदी करता यावी यासाठी कमलनाथ सरकारने हा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि ग्वालियारमधून होणार आहे. या शहरांमध्ये एक-एक दुकान उघडण्यात येणार आहे. दिल्ली तसंच इतर काही मेट्रो शहरांमध्ये अशाप्रकारे दुकानं आहेत. त्याच धर्तीवर मध्यप्रदेशातही अशी दुकानं उघडण्यात येणार आहेत. फक्त विदेशी दारू या दुकानात विकली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात वाइन आणि विस्कीचे विविध ब्रँड्स याठिकाणी असणार आहेत.

या दुकानात विकल्या जाणाऱ्या दारूवर कोणतंही अतिरिक्त शूल्क आकारण्यात येणार नाही. कारण देशामध्ये आयात होण्याआधीच हे अतिरिक्त शूल्क वसूल करण्यात येतं.  राज्यात महाग दारूचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्यातून नफा कमावण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. कमर्शिअल टॅक्स डिपार्टमेंटचे अॅडिशनल चीफ सेक्रेटरी आयसीपी केशरी यांनी दिलेल्या माहितीनुसार जे ब्रँड मध्यप्रदेशात मिळत नाही, ते ब्रँड या दुकानांमध्ये असणार आहेत. त्यामुळे महिलांना दारू खरेदी करणं अधिक सुकर होणार आहे.

(अन्य बातम्या-नोटबंदीच्या जुन्या प्रकरणांमुळे भरणार मोदी सरकारची तिजोरी, काय आहे प्लॅन?)

महिलांच्या सोयीसाठी मॉल्समध्ये ही दुकानं उघडण्यात येणार आहेत. ज्याठिकाणी महिलांना सहजपणे जाता येईल.  राज्याच्या महसुलाला चालना देण्यासाठई आणि स्थानिक ब्रँड्सची वृद्धी करण्यासाठी राज्य सरकारकडून भोपाळ, इंदौर, ग्वालियार आणि जबलपूरमध्ये वाइन फेस्टिवलचं आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्या वेळेत ही दुकानं खुली राहणार आणि वाइन फेस्टिव्हल कधी असणार याबाबतचे निर्णय एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रतलामच्या द्राक्षांपासून बनलेली दारू आणि अन्य देशी ब्रँड्सना प्रमोट करण्यासाठी टूरिस्ट जागांवर दारूची 15 नवीन दुकानं उघडण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2020 08:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading