Elec-widget

शेतकऱ्यांची 10 दिवसात सरसकट कर्जमाफी; कमलनाथ यांची घोषणा

शेतकऱ्यांची 10 दिवसात सरसकट कर्जमाफी; कमलनाथ यांची घोषणा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. निवडणूक विजयानंतर राहुल यांनी कर्जमाफीवर केलेल्या विधानावरून विरोधकांकडून त्यांना टार्गेट करण्यात आलं.

  • Share this:

भोपाळ, 14 डिसेंबर : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांची 10 दिवसात सरसकट कर्जमाफी देणार, अशी घोषणा मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी केली आहे. कमलनाथ यांचा 17 डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. निवडणूक विजयानंतर राहुल यांनी कर्जमाफीवर केलेल्या विधानावरून विरोधकांकडून त्यांना टार्गेट करण्यात आलं.

निवडणूक जिंकल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले होते की, कर्जमाफी हे शेतीवरील शेवटचं उत्तर नाही. शेती प्रश्नावरील उत्तर खूप अवघड आहे. आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करू. आम्ही कर्जमाफीदेखील देऊ.'

दरम्यान, कमलनाथ यांच्या सरकारचा 17 नोव्हेंबरला होणार आहे. स्थानिक पातळीवर चालणारा प्रचंड भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, ग्राम पंचायत पातळीवर गोशाळा उभारणी हे प्रश्न मार्गी लावणं, हे आपल्या सरकारचे पहिले प्राधान्य असेल, असं कमलनाथ म्हणाले.

Loading...

VIDEO: 25 वर्षांपासून सवयच नाही, हेल्मट न घालण्यामागे पुणेकरांनी दिली भन्नाट कारणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2018 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...