मध्य प्रदेशमध्ये 'कमल'राज, ज्योतिरादित्य शिंदेंचं स्वप्न भंगलं

मध्य प्रदेशमध्ये 'कमल'राज, ज्योतिरादित्य शिंदेंचं स्वप्न भंगलं

कमलनाथ हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहे. त्यांच्यासोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,13 डिसेंबर : मध्य प्रदेशचे कोण मुख्यमंत्री होणार यावरचा पडदा अखेर उठला आहे. कमलनाथ हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहे.त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कमलनाथ यांचा 17 तारखेला शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यांच्यासोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय.

आज नवी दिल्लीत राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रियांका गांधी याही उपस्थितीत होत्या. या बैठकीला कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे हे ही उपस्थितीत होते.

या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत निर्णय होईपर्यंत संयम राखावा असा आदेश राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. राहुल गांधी यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत एक फोटो टि्वट केला आहे. "दोन सर्वात शक्तिशाली योद्धा धैर्य आणि वेळ आहेत" असा लिओ टोलस्टाय यांचा संदेश लिहिला आहे. तसंच कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत संयम राखवा असा आदेश राहुल गांधींनी दिला.

तर भोपाळमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर होईल अशी माहिती कमलनाथ यांनी दिली.

दिल्लीतील बैठक आटोपून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशमध्ये दाखल झाले. विमानतळावर मोठ्या जल्लोष कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांचं स्वागत केलं. त्यानंतर झालेल्या आमदारांच्या बैठकीत कमलनाथ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस 114 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु, बहुमताने हुलकावणी दिली. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 2 जागांची काँग्रेसला आवश्यक्ता होती. बसपा नेत्या मायावती यांनी काँग्रेस पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. कमलनाथ यांनी राज्यपालांना भेटून सत्ता स्थापन असण्याचं पत्रही दिलं.

कमलनाथ हेच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित होतं. पण कमलनाथ यांची मुख्यमंत्रिपदी नाव निश्चित झाल्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे नाराज झाले होते. अखेर आज राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केली. आणि त्यानंतर आपला निर्णय दिला.

======================

First published: December 13, 2018, 9:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading