इंदिरा गांधींचा मानलेला मुलगा म्हणून होती मध्य प्रदेशच्या या मुख्यमंत्र्याची ओळख

न्यूज18 नेटवर्कच्या Rising India 2019 समिटमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आपले विचार मांडणार आहेत. काँग्रेसचे हे नेते गांधी परिवाराच्या विश्वासातले नेते मानले जातात. इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा अशी त्यांची त्या काळी ओळख होती.

News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2019 05:53 PM IST

इंदिरा गांधींचा मानलेला मुलगा म्हणून होती मध्य प्रदेशच्या या मुख्यमंत्र्याची ओळख

अनेक वर्ष सत्तेतून बाहेर राहिल्यानंतर 72 वर्षांचे कमलनाथ पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आले आहेत. 15 वर्षांचा वनवास संपवून त्यांनी काँग्रेसल मध्य प्रदेशात सत्ता मिळवून दिली. राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून आता त्यांना पाच वर्ष काँग्रेसची लोकप्रियता टिकवून ठेवावी लागणार आहे.

अनेक वर्ष सत्तेतून बाहेर राहिल्यानंतर 72 वर्षांचे कमलनाथ पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आले आहेत. 15 वर्षांचा वनवास संपवून त्यांनी काँग्रेसला मध्य प्रदेशात सत्ता मिळवून दिली. राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून आता त्यांना पाच वर्ष काँग्रेसची लोकप्रियता टिकवून ठेवावी लागणार आहे.

(फोटो सौजन्य-पीटीआय)

गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या कमलनाथ यांची राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकून काँग्रेसला राज्यात पुन्हा उभारी मिळवून दिली.

Loading...

कानपूरला संपन्न परिवारात त्यांचा जन्म झाला. कमलनाथ यांचे शिक्षण जगप्रसिद्ध डुन स्कूलमध्ये झालं. तिथेच त्यांची संजय गांधी यांच्याशी ओळख झाली. पुढे ते जिगरी दोस्त झाले. त्यांची ही मैत्री एवढी घट्ट होती की इंदिरा गांधी या कमलनाथ यांना आपला तिसरा मुलगाच मानत होत्या. संजय गांधी एवढच त्यांचं कमलनाथ यांच्यावरही प्रेम होतं. त्यावेळी एक घोषणा प्रसिद्ध होती, इंदिरा गांधी एक दो हाथ एक संजय और एक कमलनाथ

वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर संजय गांधी यांच्यासोबत कामाला सुरूवात केली. संजय गांधी ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाचे ते सक्रिय सदस्य होते.

कमलनाथ यांच्याबाबत एक गोष्ट सांगितली जाते की गेल्या 30 वर्षात त्यांच्यातल्या च्युइंगम खाणं, दुर्मिळ आगपेट्या जमविणं आणि गांधी घराण्याप्रती निष्ठा या तीन गोष्टी कधीच बदलल्या नाहीत. 1975 मध्ये आणिबाणि लादल्यानंतरही त्यांनी कमलनाथ यांनी संजय गांधी यांची कधीच साथ सोडली नाही. आणीबाणीचे कट्टर समर्थक होते. त्यावेळच्या सर्व वादग्रस्त उपक्रमात त्यांनी संजय गांधींची मदत केली.

कमलनाथ यांच्याबाबत एक गोष्ट सांगितली जाते की गेल्या 30 वर्षात त्यांच्यातल्या च्युइंगम खाणं, दुर्मिळ आगपेट्या जमविणं आणि गांधी घराण्याप्रती निष्ठा या तीन गोष्टी कधीच बदलल्या नाहीत.
1975 मध्ये आणिबाणि लादल्यानंतरही त्यांनी कमलनाथ यांनी संजय गांधी यांची कधीच साथ सोडली नाही. आणीबाणीचे कट्टर समर्थक होते. त्यावेळच्या सर्व वादग्रस्त उपक्रमात त्यांनी संजय गांधींची मदत केली.

1977 मध्ये जेव्हा देशात जनता पक्षाचं सरकार आलं त्यानंतर संजय गांधी यांना जेलमध्ये जावं लागलं. तेव्हा इंदिरा गांधी या संजय यांच्या सुरक्षेबाबत चिंताग्रस्त होत्या तेव्हा कमलनाथ यांनी नाट्यमयपद्धतीनं तिहारमध्ये प्रवेश मिळवला आणि संजय गांधींची सोबत केली.

तिहारमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी वकिलामार्फत एक योजना तयार केली. एका प्रकरणात कोर्टात गेले असताना त्यांनी न्यायाधिशांवर कागदाचे बोळे फेकून मारले. तरीही न्यायाधीश शिक्षा देत नाहीत असं दिसल्यावर त्यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. शेवटी न्यायाधीशांनी त्यांना 500 रुपये दंड ठोठावला. तेव्हा त्यांनी दंड भरायला नकार दिला आणि त्यांची रवानगी जेलमध्ये झाली.

नंतरच्या काळात ते केंद्रात मंत्री झाले. राजीव गांधी सोबतही त्यांची मैत्री होती. नंतर सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांच्याशीही त्यांनी चांगलं जमवून घेतलं आणि आता त्याचं त्यांना फळही मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...