Home /News /national /

कमलनाथना बहुमताची खात्री, गेलेल्या आमदारांसह भाजपेच नाराज संपर्कात असल्याचा दावा

कमलनाथना बहुमताची खात्री, गेलेल्या आमदारांसह भाजपेच नाराज संपर्कात असल्याचा दावा

मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारवर आलेल्या ज्योतिरादित्य संकटामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अडचणीत आलं आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या २२ आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री कलनाथ यांच्याकडे राजीनामे सोपवले. सरकार अल्पमतात आहे हे मान्य करायला कमलनाथ मात्र तयार नाहीत.

पुढे वाचा ...
    भोपाळ, दि. 11 मार्च: मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारवर आलेल्या ज्योतिरादित्य संकटामुळे मुख्यमंत्री कमलनाथ  यांचं सरकार अडचणीत आलं आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या २२ आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री कलनाथ यांच्याकडे राजीनामे सोपवले. यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा मंजूर करताच त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली. यानंतर मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण सरकार अल्पमतात आहे हे मान्य करायला कमलनाथ मात्र तयार नाहीत. काय करणार कमलनाथ? अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपले विश्वासून सहकारी सज्जनसिंह वर्मा यांच्यावर नाराज आमदारांची समजूत काढण्याची जबाबदारी सोपवली आहे. कमलनाथ यांच्यावर नाराज असलेले आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आमदार बंगळुरू ला एका हॉटेलमध्ये राहात आहेत. या सगळ्या नाराजांची समजूत काढण्यासाठी (Sajjan Singh Verma) स्वत: बंगळुरू (Bengaluru) ला जाऊ शकतात. रविवारी संध्याकाळी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक होती, त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण आता नव्या माहितीनुसार शिंदे १२ मार्चला काही भाजपात प्रवेश घेऊ शकतात. यामुळे काँग्रेसला नाराजांची समजूत काढण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे.  यामुळे कमलनाथ यांनी नाराजांंचं मन वळवण्याचा विश्वास आहे. ही बातमी नक्की वाचा : मध्य प्रदेशात भाजपचं सरकार नाही येणार; कमलनाथ खेळणार हा मास्टरस्ट्रोक? काही आमदारांची फसवणुक झाली? दरम्यान, बंगळुरूला नेण्यात आलेल्या काही काँग्रेस आमदारांना त्यांच्या इच्छेच्या विरोधात नेण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसचे नेते लक्ष्मणसिंह यांचा दावा आहे की, फसवून बंगळुरूला  नेण्यात आलेले अेक आमदार आपल्या संपर्कात आहेत. तर २२ नव्हे फक्त १९ आमदारांनीच आपले राजीनामे विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.आमच्याकडे कोणत्याही अडचणीच्या काळात मार्ग काढण्यासाठी यंत्रणा सक्रीय असल्याचं राज्यातले काँग्रेसचे नेते सांगत आहेत. बंडखोर बंगळुरूला तर काँग्रेसचे आमदार भोपाळमध्येच कुठल्यातरी हॉटेलमध्ये एकत्र असतील. तर भाजप आपल्या आमदारांना १६ तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत दिल्लीला घेऊन जात आहे. हे नक्की वाचा : ज्योतिरादित्यंना कुटुंबियांची साथ; मुलगा म्हणाला, वडिलांच्या निर्णयाचा अभिमान १२ मार्च ला काय होणार? येत्या आठवड्यात म्हणजे १६ मार्च ला मध्यप्रदेशच्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. पण त्यापूर्वीच म्हणजे १२ मार्चला काँग्रेसची साथ आणि हात सोडलेले नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अर्थात याची कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या