'काश्मीरच्या मुद्यावर जनमत का घेतलं जात नाही?' कमल हसनचं वादग्रस्त वक्तव्य

'काश्मीरच्या मुद्यावर जनमत का घेतलं जात नाही?' कमल हसनचं वादग्रस्त वक्तव्य

काश्मीरमध्ये जनमत घ्या असं वादग्रस्त विधान कमल हसननं केलं आहे.

  • Share this:

चेन्नई, 18 फेब्रुवारी : पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या आत्मघातकी भ्याड हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येक भारतीय निषेध नोंदवत आहे. देशभर जोरदार निदर्शने देखील करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर आता कमल हसननं वादग्रस्त विधान केलं आहे. चेन्नईतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना कमल हसननं जवानांचाच जीव का जातो? दोन्ही देशाच्या नेत्यांनी संबंध सुधारण्यावर भर दिल्यास जवानांचा जीव जाणार नाही असं म्हटलं आहे. शिवाय, काश्मीरच्या मुद्यावर जनमत का घेतलं जात नाही? सरकारला कोणत्या गोष्टीची भीती वाटते?, असा सवाल केला आहे. कमल हसन यांच्या या विधानावर आता टीका सुरु झाली आहे.

40 जवान शहीद

14 फेब्रुवारी पुलवामा येथे जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघातकी बॉम्ब हल्ला केला होता. यावेळी जवानांचा ताफा जात असताना स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ट्रकवर आदळली. यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर देशभर संताप उसळला आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तानविरोधात निदर्शनं केली जात आहेत. दहशतवाद्यांना धडा शिकवा अशी मागणी आता जोर धरताना दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. शहीद जवानांचा बदला घेण्यासाठी सैन्याला पूर्णपणे मुभा देण्यात आल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानविरोधात कडक पावलं

या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहेत. भारतानं पाकिस्तानचा फेवर्ड नेशनचा दर्जा देखील काढून घेतला असून पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तुवरील आयात शुल्क देखील वाढवण्यात आले आहेत.

VIDEO : शरद पवारांना 'शकुनी मामा'म्हणता, तुमची औकात काय? - अजित पवार

First published: February 18, 2019, 1:14 PM IST

ताज्या बातम्या