कमल हसनची राजकारणात एन्ट्री; मक्कल निधी मय्यम पक्षाची स्थापना

कमल हसनची राजकारणात एन्ट्री; मक्कल निधी मय्यम पक्षाची स्थापना

कमल हसनने खूप आधीच आपण राजकारणात येणार असल्याची घोषणा केली होती. रजनीकांतनेसुद्धा आपण राजकारणात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता त्यादृष्टीने पहिलं पाऊलंच कमल हसनने टाकलं आहे .

  • Share this:

21 फेब्रुवारी: राजकारणात येण्याची घोषणा केल्यानंतर कमल हसनने आता राजकारणात सक्रिय प्रवेश केला  आहे. मक्कल निधी मय्यम या पक्षाची स्थापना कमल हसन याने आज मदुरैमध्ये केली आहे.

कमल हसनने खूप आधीच आपण राजकारणात येणार असल्याची  घोषणा केली होती. रजनीकांतनेसुद्धा आपण राजकारणात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता त्यादृष्टीने पहिलं पाऊलंच कमल हसनने टाकलं  आहे . आज  दिल्लीचे  मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळ नाडूच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही कोण भरणार असा प्रश्नही उपस्थित झाला होता. पण आता रजनीकांत आणि कमल हसन हे दोघंही तामिळ नाडूच्या राजकारणाला पुढे नेणार असं चित्र दिसतंय. त्यामुळे तामिळ नाडूच्या   2021च्या निवडणुकीत कोण बाजी मारतं  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मक्कल निधी मय्यम या शब्दांचा अर्थ लोकांच्या न्यायाचा पक्ष किंवा ठिकाण असा होतो. हा लोकाचांच पक्ष आहे  असं विधान आज कमल हसनने केलं आहे. हा पक्ष येता बराच काळ तामिळ नाडूच्या राजकारणात राहणार असून हा पक्ष  निश्चितच  बदल घडवून आणेल  असं कमल हसनने स्पष्ट केलं आहे. आपल्या भाषणात भ्रष्टाचार हा मुख्य शत्रू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं  आणि इतक्या लांबून येऊन या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवल्या बद्दल अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले.

आता हा पक्ष तामिळ नाडूच्या राजकारणात काब बदल घडवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: February 21, 2018, 8:12 PM IST

ताज्या बातम्या