News18 Lokmat

लोकसभा निवडणुकीबाबत कमल हसननं घेतला मोठा निर्णय

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींबाबत कमल हसननं मोठा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 11:01 PM IST

लोकसभा निवडणुकीबाबत कमल हसननं घेतला मोठा निर्णय

कोईंबतूर, 24 मार्च : अभिनेता आणि राजकारणी असलेल्या कमल हसननं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. स्वत:चा पक्ष स्थापन केल्यानंतर कमल हसन लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. पण, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वत: न उतरण्याचा निर्णय कमल हसननं घेतला आहे. त्याऐवजी कमल हसन उमेदवारांच्या प्रचारावर लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यानं स्वत: याबाबतची माहिती दिली. कोईंबतूर येथे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना त्यानं निवडणुकीच्या रिंगणात मी उतरणार नसून उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीकरता 40 जागांवर कमल हसन पक्षाचे उमेदवार उभे करणार आहे.

रजनीकांतनं देखील पक्ष स्थापन केला असून लोकसभा निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला आहे.


VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 11:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...