रजनीकांत यांचं राजकारण भगवं नसावं- कमल हासन

रजनीकांत यांचं राजकारण भगवं नसावं- कमल हासन

रजनीकांत आणि आपल्यामध्ये खूप चांगली मैत्री असून, राजकारण आणि मैत्री या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

  • Share this:

11 फेब्रुवारी : रजनीकांत यांचं राजकारण भगवं नसावं, असं मत  अभिनेता कमल हासन यांनी व्यक्त केलंय. रजनीकांत आणि आपल्यामध्ये खूप चांगली मैत्री असून, राजकारण आणि मैत्री या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या राजकीय प्रवेशाविषयी कमल हासन यांनी केलेले हे वक्तव्य पाहता रजनीकांत यांच्यासोबत त्यांची युती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची निराशा झाली आहे असंच म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपण तूर्तास युतीचा निर्णय घेतला नसल्याचंही स्पष्ट केले होते. राजकीय प्रवेशाविषयी बऱ्या गोष्टी गुलदस्त्यात ठेवणारे हासन येत्या काळात रजनीकांत यांच्या विरोधात राजकारणाच्या मैदानात उतरणार का, हाच प्रश्न सर्वसामान्य जनता आणि राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर २१ फेब्रुवारीला मिळण्याची चिन्हं आहेत. कारण, याच दिवशी कमल हासन त्यांच्या निर्णयाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल घोषणा करतील, असे म्हटले जातेय.

First published: February 11, 2018, 1:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading