पारंपरिक पेक्षा वॉटर बर्थ पद्धतीचे धोके कमी, जाणून घ्या काय आहे पद्धत?

पारंपरिक पेक्षा वॉटर बर्थ पद्धतीचे धोके कमी, जाणून घ्या काय आहे पद्धत?

वॉटर बर्थ पद्धतीने बाळाला जन्म देण्याची अभिनेत्री कल्कि कोचलीनची इच्छा आहे

  • Share this:

मुंबई 19 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची एक्स बायको कल्की कोचलीनच्या घरात लवकरच बाळांचं रडू ऐकू येणार आहे. कल्किने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. ती पाच महिन्यांची गर्भवती आहे. वॉटर बर्थ पद्धतीने बाळाला जन्म देण्याची तिची इच्छा आहे. या पद्धतीने बाळाला जन्म द्यावयाचा असल्यास काही नियमांचे पालन करावे लागते. कल्किने त्या सवयींचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. कल्कि गर्भवतीचा अधिक वेळ गाणे ऐकण्यात घालवते आणि त्यासोबत दूरपर्यत चालणे याच्यात घालवत असते. इतकेच नव्हे तर तिने मोबाईल फोनचा वापर देखील कमी केला आहे.

‘वॉटर बर्थ’ ही पद्धत बाळाला जन्म देण्याच्या प्रकियेपेक्षा खूप वेगळी आहे. भारतात जरी सर्रास या पद्धतीने बाळाला जन्म दिला जात नसला तरी परदेशात मात्र  वॉटर बर्थ पद्धतीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. वॉटर बर्थ पद्धतीची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. अनेक महिला या पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे.  अलिकडेच ब्रुना अब्दुल्ला यांनीही पाण्यामध्येच बाळाला जन्म दिल्याचं समोर आलं होते. भारतामध्ये देखील काही हॉस्पिटलमध्ये वॉटर बर्थ पद्धत सुरु करण्यात आली आहे.

साधारण पारंपरिक पद्धतीने बाळाला जन्म देताना होणाऱ्या त्रासाच्या तुलनेत वॉटर बर्थ या पद्धतीमध्ये होणार त्रास कमी असतो. वॉटर बर्थ पद्धत म्हणजे बाळाला पाण्यात जन्म देणे. यामध्ये एका मोठ्या टपात गरम पाणी टाकले जाते. त्यामध्ये गर्भवती महिला आरामात बसू शकते. ही पद्धत घरामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये देखील करता येते. वॉटर बर्थ ही पद्धत गर्भकळा कमी करण्यात मदत करते. परंतु या पद्धतीला सावधानपूर्वक करायला हवे. अन्यथा होणाऱ्या बाळाच्या तब्बेतीवर याचा परिणाम होऊ शकतो.

First published: January 20, 2020, 12:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या