45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; देवाचा अवतार सांगणाऱ्या बाबाकडे सापडले घबाड!

ही संपत्ती सामान्य माणसाची असणं शक्यच नाही. तर ही संपत्ती कल्की देवाचा अवतार म्हणवणाऱ्या विजय कुमार नायडू याची आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 11:17 PM IST

45 कोटी रोख तर 115 बँकेत, हवाल्यातून 100 कोटी; देवाचा अवतार सांगणाऱ्या बाबाकडे सापडले घबाड!

तामिळनाडू, 22 ऑक्टोबर : कल्की आश्रमाशी संबंधित ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधींची बेनामी संपत्ती उघड झाली आहे. स्वत:ला कल्की देवाचा अवतार म्हणवणाऱ्या विजयकुमार नायडूची 800 कोटींची अघोषित संपत्ती उघड झाली आहे. त्याचवेळी नायडूनं एक व्हिडिओ प्रसिद्ध करून देश सोडून कुठेही गेलेलो नाही, असं स्पष्टीकरण दिलंय.

ही संपत्ती सामान्य माणसाची असणं शक्यच नाही. तर ही संपत्ती कल्की देवाचा अवतार म्हणवणाऱ्या विजय कुमार नायडू याची आहे. नायडू आणि त्याच्या मुलाच्या आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकातल्या ठिकाणांवर आयकर विभागानं छापे टाकले.

आंध्र प्रदेशातल्या विजयकुमार नायडू यांच्या कल्की आश्रमासह अन्य 39 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. त्या छाप्यांमध्ये हे सर्व घबाड उघड झाले. झाडाझडतीनंतर 45 कोटींची रोकड, 20 कोटी मूल्य असलेले अमेरिकी डॉलर जप्त करण्यात आले. 31 कोटींचे दागिनेही जप्त करण्यात आले. मागील पाच दिवसांपासून विविध ठिकाणी ही झाडाझडती सुरू होती. ही कारवाई करण्यासाठी सुमारे तीनशे अधिकारी झटत होते.

अध्यात्मिक गुरू कल्कीचा मुलगा कृष्णा आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना प्राप्तिकर विभागानं समन्स बजावले असून, चौकशीसाठी बोलावलंय.

स्वतःला देवाचा अवतार समजणाऱ्या विजय कुमार नायडूने व्हिडिओ प्रसिद्ध करून यासंबंधी स्पष्टीकरण दिलंय. 'मी देश सोडून गेलेलो नाही किंवा मी अन्य कुठेही गेलो नाही. मी इथेच आहे आणि माझी प्रकृती ठीक आहे', असा दावा त्यानं केला.

Loading...

कल्कीचा मुलगा आणि सुनेनं चौकशीत सहकार्य करण्याऐवजी प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. एकंदरीतच सर्व चौकशी झाल्यानंतर कल्कीचा हा संपत्तीचा अवतार संपुष्टात येणार हे नक्की.

==============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 11:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...