तिकीट न मिळाल्यामुळे भाजप नेत्याला अश्रू अनावर, भर सभेत ढसा-ढसा रडले

भाजपमधील बाहेरून आलेल्या उमेदवाराला हजारो कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत गोलन यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 12:54 PM IST

तिकीट न मिळाल्यामुळे भाजप नेत्याला अश्रू अनावर, भर सभेत ढसा-ढसा रडले

कैथल (हरियाणा), 02 ऑक्टोबर : ’माझ्या तीस वर्षांच्या तपश्चर्येचे फळ भाजपनं धोका देऊन परत केलं. मोठं षडयंत्र रचून मुख्यमंत्र्यांनी माझं तिकीट कापलं माझी दोन्ही मुलेही भाजपमध्ये जन्मली.’ हे शब्द भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रणधीर गोलन यांचे आहेत. पक्षाने विधानसभेत तिकीट न दिल्यामुळे एका कार्यक्रमात बोलताना ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. बरं इकतंच नाही तर त्यांनी कार्यकर्त्यांच्या संमतीने भाजपविरूद्ध बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणाही दिली आहे.

भाजपमधील बाहेरून आलेल्या उमेदवाराला हजारो कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत गोलन यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केलं. इतक्या वर्ष पक्षाचं काम केलं आणि तरीही तिकीट न मिळाल्यामुळे गोलन यांना  त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर रडू कोसळलं. यावेळई ते म्हणाले की, ‘भाजपसाठी त्यांनी आपलं रक्त आणि घाम गाळला. 30 वर्ष कोणतीही पर्वा न करता दिवस-रात्र पक्षाच्या विकासासाठी काम केलं. आता जेव्हा संधी आली तेव्हा पक्षाने पाठीवर वार केला. माझीच एकच चुक झाली ती म्हणजे कार्यकारणी बैठकीत त्यांनी विज चोरीच्या छाप्यावर आवाज उठवला.’ अशी टीका गोलन यांनी भाजपवर केली आहे.

इतर बातम्या - नवी मुंबई मनपा High Voltage मीटिंग, गणेश नाईकांच्या भूमिकेवर महाराष्ट्राचं लक्ष

भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे रणधीर गोलन हे प्रचंड नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली. ‘जनहितासाठी आपण नेहमीच आवाज उठवणार आहोत. बाहेरून उमेदवार देऊन पक्षाने त्यांचाच नव्हे तर अडीच दशलक्ष मतदारांचा अपमान केला आहे. त्यांना मला तिकीट द्यायचं नव्हतं हे मान्य पण इतर कोणत्याही कार्यकर्त्याला ते तिकीट देऊ शकत होते.’ असा आरोपी गोलन यांनी केला आहे.

Loading...

गोलन यांच्या पत्नीही झाल्या भावूक

इतर बातम्या - उमेदवारी नाकारलेल्या भाजप कार्यकर्त्याचा संताप, पोस्टरवर लिहिलं...!

बैठकीस उपस्थित कार्यकर्त्यांनी गोलन यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तर भाजपने उमेदवारी दिलेल्या नेत्याला गावात प्रवेश न देण्याचंही त्यांनी ठरवलं आहे. या कार्यक्रमात गोलन यांच्या पत्नीदेखील उपस्थित होत्या. पक्ष मजबूत करण्यासाठी आपल्या घराकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही असं सांगत त्यादेखील भावूक झाल्या.

इतर बातम्या - मुख्यमंत्र्यांनी घात केला, भाजपचा इच्छुक बंडखोरी करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2019 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...