कैरानामध्ये नाही चाललं 'इमोशनल कार्ड', भाजपला मोठा धक्का

कैरानामध्ये नाही चाललं 'इमोशनल कार्ड', भाजपला मोठा धक्का

उत्तर प्रदेशच्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये आरएलडी उमेदवार तबस्सुम हसन यांचा विजय झाला आहे. भाजपच्या उमेदवार मृगांका सिंह यांचा 50,000 मतांनी त्यांनी पराभव केला आहे.

  • Share this:

उत्तर प्रदेश, ता. 30 मे : उत्तर प्रदेशच्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये आरएलडी उमेदवार तबस्सुम हसन यांचा विजय झाला आहे. भाजपच्या उमेदवार मृगांका सिंह यांचा 50,000 मतांनी त्यांनी पराभव केला आहे.

कैरानात मतमोजणीच्या 21व्या फेरीची गणना पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांना 4 लाख 21 हजार 145 मतं मिळाली. भाजपचे मृगंका यांना 3 लाख 71 हजार 691 मतं मिळाली. तबस्सुम हसन या 49454 मतांनी मृगंका यांच्या पुढे आहेत.

दरम्यान, कैरानामध्ये पराभूत झाल्यानंतर भाजपाच्या उमेदवार मृगंका सिंह यांनी युतीच्या उमेदवार म्हणून तबस्सुम यांना अभिनंदन केलं. आणि म्हणाल्या की. त्यांनी पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा स्वीकार केला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या योजना आणि कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतली. पण तरीही आमचा काही मतांनी पराभव झाला.

'कार्यकर्त्यांच्या कठोर मेहनीनंतरही आमचा पराभव झाल्यामुळे मला अपराधी असल्यासारखं वाटतं आहे. पण पोटनिवडणुकीत युती उमेदवारांची ताकद दिसून येते. भविष्यात या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्हाला नवीन धोरणं तयार करावी लागतील.' असंही त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2018 04:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading