उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वे अपघात; 70हून अधिक जखमी

उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वे अपघात; 70हून अधिक जखमी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री अडीच पावणेतीनच्या सुमारास अच्छल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनदरम्यान एका डंपरला धडकल्याने कैफियत एक्सप्रेसचे नऊ डबे रूळाखाली घसरले.

  • Share this:

औरेया,23 ऑगस्ट: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा रेल्वे रुळावरून घसरलीय. कैफियत एक्सप्रेसचे डबे घसरून कमीत कमी 70 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. उत्तर प्रदेशमधल्या आझमगडहून दिल्लीला ही एक्स्प्रेस जात होती. त्यावेळी इटावाह आणि कानपूरदरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री अडीच पावणेतीनच्या सुमारास अच्छल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनदरम्यान एका डंपरला धडकल्याने कैफियत एक्सप्रेसचे नऊ डबे रूळाखाली घसरले. दरम्यान जखमींना लगेच जवळच्या रुग्णायलयात दाखल केले गेले आहे. स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. तशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे दिल्ली-हावरा मार्गावरच्या 5 ट्रेन रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी मुजफ्फरनगरच्या खतौलीत कलिंग उत्कल एक्स्प्रेसचे काही डबे असेच रूळांवरून घसरून असाच अपघात झाला होता. दरम्यान या दोन  अपघातांच्या  पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.पण अजूनतरी  तो सुरेश प्रभूंनी स्वीकारला नसल्याचं कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 09:03 AM IST

ताज्या बातम्या