VIDEO : युपीत मोदी-शहांना हे 'मराठी रक्त'देखील देणार आव्हान

VIDEO : युपीत मोदी-शहांना हे 'मराठी रक्त'देखील देणार आव्हान

लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी काँग्रेसने मास्टरस्ट्रोक मारला आहे.

  • Share this:

लखनौ, 23 जानेवारी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बहिण प्रियांका यांच्यावर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावरही पक्षाने उत्तर प्रदेशात मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसकडून पश्चिम युपीसाठी प्रभारी म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांची नेमणूक केली आहे.

ज्योतिरादित्य यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आल्यानंतर आपण मूळचे शिंदे असल्याचं सांगितलं होतं. तसंच माझं रक्त मराठी आहे, असंही ज्योतिरादित्य म्हणाले होते. आता हेच ज्योतिरादित्य उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना टक्कर देताना दिसतील.

लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी काँग्रेसने मास्टरस्ट्रोक मारला आहे. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जाणारी मागणी अखेर आज पूर्ण झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना पक्षातील महासचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत प्रियांका सहभागी झाल्याचं चित्र दिसत होतं. राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाचा पेच तयार झाला तेव्हा त्यांनीच पुढाकार घेतला होता.

राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी प्रचंड स्पर्धा होती. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी प्रियांका या भाऊ राहुल गांधी यांच्या मदतीला धावल्या होत्या.प्रियांका यांनी आतापर्यंत निवडणूक लढवलेली नसली तरीही त्या याआधीही अनेकदा राजकीय मंचावर दिसल्या आहेत.

राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ अमेठी आणि सोनिया गांधी जिथून निवडून येतात त्या रायबरेली या मतदारसंघात प्रियांका नियमितपणे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. आता तर पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमणूक झाल्याने प्रियांका या सक्रिय राजकारणातच पाहायला मिळतील.


VIDEO : बास्केटबॉलच्या मॅचमध्ये WWE, तरुणींमध्ये तुफान हाणामारी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या