मराठी बातम्या /बातम्या /देश /

राहुल गांधींसोबत ज्योतिरादित्य शिंदेदेखील होते त्या पार्टीत? Photo मुळे जोरदार चर्चा!

राहुल गांधींसोबत ज्योतिरादित्य शिंदेदेखील होते त्या पार्टीत? Photo मुळे जोरदार चर्चा!

जाणून घ्या काय आहे त्या फोटोमागील सत्य...

जाणून घ्या काय आहे त्या फोटोमागील सत्य...

जाणून घ्या काय आहे त्या फोटोमागील सत्य...

  नवी दिल्ली, 5 मे : बॉलिवूड सेलेब्रिटीजप्रमाणे राजकीय व्यक्तींचे फोटोज, व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. अशा फोटो किंवा व्हिडिओची जोरदार चर्चा होते. यावरून काहीवेळा राजकारण देखील तापतं आणि आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. अलीकडच्या काळात असे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसतं. सध्या कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही फोटो (Photo) जोरदार चर्चेत आहेत.
  राहुल गांधी नेपाळ (Nepal) दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा क्लबमधला एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. आता व्हायरल झालेला फोटो अनेक युजर्स ट्विट करताना दिसत आहेत. हा फोटो सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. अर्थात त्यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण या फोटोत राहुल गांधी यांच्या समवेत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) देखील आहेत. मात्र या फोटोमागील सत्य काहीसं वेगळं आहे. `नवभारत टाईम्स`ने याविषयीची माहिती दिली आहे.
  काठमांडू येथील `सीएनएन`ची माजी बातमीदार सुमनिमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी राहुल काठमांडूला (Kathmandu) गेले होते. सुमनिमा ही नेपाळमधल्या म्यानमारच्या राजदूताची मुलगी आहे. हा राहुल यांचा खासगी दौरा होता. `सीएनएन`ची माजी बातमीदार सुमनिमा हिचा विवाह नीमा मार्टिन शेर्पा यांच्याशी होत आहे. या सोहळ्यापूर्वी राहुल गांधी यांचा नाइटक्लब मधला व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर भाजपने (BJP) जोरदार टिका केली होती.
  त्यानंतर आता सोशल मीडियावर राहुल गांधी आणि एकेकाळी कॉंग्रेसचे नेते असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो नेपाळमधला असल्याचं काही युजर्स सोशल मीडियावर सांगत आहेत. ज्योतिष एचएम नावाच्या एका युजरनं हा फोटो ट्विट करत नेपाळमध्ये एका विवाह समारंभाला राहुल गांधी गेले आहेत, त्याच समारंभात शिंदेदेखील सहभागी झाले आहेत. मग भाजप यावरून एवढा गदारोळ का करत आहे, असं म्हटलं आहे.
  या फोटोत राहुल गांधी यांच्यासोबत ज्योतिरादित्य शिंदे दिसत आहेत. काही महिला राहुल यांचे मोबाईलवर फोटो काढताना दिसत आहेत. यावेळी शिंदे राहुल यांच्या उजव्या बाजूला उभे असल्याचे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी नेपाळमधल्या एका क्लबमधील राहुल गांधी यांचा व्हिडिओ ट्विट करत भाजपने त्यांच्यावर टिकास्त्र सोडलं होतं.
  दरम्यान, जोरदार व्हायरल होत असलेल्या या फोटोमागचं सत्य वेगळंच आहे. वास्तविकपणे राहुल यांच्यासोबत ज्योतिरादित्य शिंदे असलेला जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, तो 2011 मधला आहे. या फोटोत राहुल गांधी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री शिंदे यांच्या सोबत दिसत आहेत. राहुल भुतानचे (Bhutan) राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. वांगचुक हे त्यांची बालमैत्रिण जेत्सुन पेमी यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. राहुल गांधी त्यावेळी कॉंग्रेसचे सरचिटणीस होते तर शिंदे हे युपीए-2 सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते. सध्या शिंदे नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत.
  First published:

  Tags: Nepal, Rahul gandhi

  पुढील बातम्या