Home /News /national /

‘ज्योतिरादित्य शिंदे म्हणजे नाग’; काँग्रेस नेत्याने नागपंचमीच्या दिल्या शुभेच्छा

‘ज्योतिरादित्य शिंदे म्हणजे नाग’; काँग्रेस नेत्याने नागपंचमीच्या दिल्या शुभेच्छा

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेते वारंवार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधत आहेत.

    नवी दिल्ली, 25 जुलै : भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेते वारंवार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधत आहेत. यादरम्यान नागपंचमीच्या सणानिमित्त मध्य प्रदेशाच माजी काँग्रेस अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी ज्योतिरादित्यांवर निशाणा साधला आहे. अरुण यादव यांनी ज्योतिरादित्यांची फोटो ट्विट करीत त्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते अरुण यादव यांनी ज्योतिरादित्यांचा फोटो शेअर करीत लिहिले आहे – नागपंचमीच्या शुभेच्छा...प्रश्न हा आहे की खऱचं अरुण यादव ज्योतिरादित्य शिंदे  यांना साप म्हणत आहेत? काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर पार्टीचे काही नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर वारंवार टीका करीत आहेत. हे वाचा-5 ऑगस्टला राज्यात मंदिरं उघडण्यासाठी भाजप मागणी, मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र यावर्षी मार्चमध्ये माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये सामील झाले. त्यांनी भाजपल सामील झाल्यानंतर म्हटले होते की काँग्रेस आता पहिल्यासारखी राहिली नाही. त्यामुळे तिथे राहून मी जनसेवा करता येत नाही. हे वाचा-सचिन बाहेर पडताच गेहलोत यांच्या मुलाची दणक्यात एन्ट्री; भाजपविरोधात फटकेबाजी ज्योतिरादित्यांचा दबदबा सांगितले जात आहे की मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मदतीमुळे भाजप सरकार बनवू शकली आहे. याच कारणास्तव शिवराज सिंह चौहान यांची सरकारमध्ये शिंदे समर्थकांचा प्रभाव कायम आहे. याचा परिणाम मध्य प्रदेश कॅबिनेट विस्तारमध्येही पाहण्यात आलं.  शिवराज सिंह चौहानसह भाजपच्या अनेक केंद्रीय नेते आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामध्ये अनेक बैठकीनंतर विभागवार विभाजनावर सहमती होऊ शकली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Congress

    पुढील बातम्या