मराठी बातम्या /बातम्या /देश /

मराठमोळे न्यायमूर्ती उदय लळीत होणार 49 वे सरन्यायाधीश; घरातच कायदेतजज्ज्ञांची परंपरा

मराठमोळे न्यायमूर्ती उदय लळीत होणार 49 वे सरन्यायाधीश; घरातच कायदेतजज्ज्ञांची परंपरा

Justice UU Lalit: न्यायमूर्ती उदय लळीत हे देशाचे नवे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून नियुक्ती केली.

  • Published by:  Rahul Punde
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : कोकणवासीयांच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड (Sindhudurg Devgad) तालुक्यातील सुपुत्र भारताचे 49 वे सरन्यायाधीश (Chief Justice) होणार आहेत. 27 ऑगस्टला न्यायमूर्ती उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) हे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्ती आदेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. वर्तमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा एक दिवस अगोदर 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, "राज्यघटनेच्या कलम 124 च्या कलम-II च्या तरतुदींनुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती मुर्मू यांनी न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती 27 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल. न्यायमूर्ती लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षा कमी असेल. 8 नोव्हेंबर रोजी ते वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होणार आहेत. CJI म्हणून न्यायमूर्ती लळीत कॉलेजियमचे प्रमुख असतील, ज्यात न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती कौल, न्यायमूर्ती नझीर आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश असेल. घरण्यात कायदेतजज्ज्ञांची परंपरा न्यायमूर्ती उदय लळीत हे मुळचे देवगड तालुक्यातील गिऱ्ये गावातील आहेत. आजही या गावात लळीत यांची आठ ते दहा कुटुंब वास्तव्याला आहेत. उदय लळीत यांच्या घरण्याला कायदेतजज्ज्ञांची एक परंपराच आहे. उदय लळीत यांचे वडिल उमेळ लळीत हेदेखील मुंबई उच्च न्यायलयाचे ज्येष्ठ वकिल होते. त्यांनी 1974 ते 76 च्या काळात ते नागपूर खंडपीठाचे अतिरिक्त सरन्यायाधीश झाले होते. वाचा - भीमा कोरेगाव प्रकरणी अखेर वरवरा राव यांना जामीन मंजूर मुंबईतून शिक्षण पूर्ण आता सरन्यायाधीश म्हणून विराजमान होणाऱ्या उदय लळीत यांनी आपले शिक्षण मुंबईत पुर्ण केले असून त्यांनी 1983 आपल्या वकिलीला सुरुवात केली होती. तर दिवंगत ज्येष्ठ वकिल एम. एम. राणे यांच्याकडे त्यांनी वकिली केली होती. 2004 मध्ये सर्वोच्च न्यायलयाने उदय लळीत यांना ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशीत केले होते. देशभरातील असंख्य महत्वाच्या खटल्यांमध्ये आपल्या वकीलीचा त्यांनी ठसा उमटवला आहे. सात वर्षे ते महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्य न्यायालयाच्या पॅनेलवर ज्येष्ठ वकील म्हणून काम पाहत होते. देशातील सुमारे 14 राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्य न्यायलयात प्रकरणे चालवली.
First published:

Tags: Supreme court

पुढील बातम्या