न्यायमूर्ती बोबडे भारताचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब!

न्यायमूर्ती बोबडे भारताचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब!

भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बोबडे 18 नोव्हेंबर रोजी शपथ घेतील. त्यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : भारताच्या सरन्यायाधीश पदी न्यायमूर्ती एस ए बोबडे यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 18 नोव्हेंबरला बोबडे सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. वाय वी चंद्रचूड यांच्यानंतर सरन्यायाधीश होणारे बोबडे दुसरे मराठी व्यक्ती ठरले आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती. पुढील सरन्यायाधीशांसाठी केंद्र सरकारला पत्र लिहलं होतं. न्यायमूर्ती बोबडे हे 47 वे सरन्यायाधीश असतील. 23 एप्रिल 2021 पर्यंत बोबडे सरन्यायाधीश पदी असणार आहे.

बोबडे यांचा 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात जन्म झाला. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. बोबडे महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू देखील आहेत. बोबडे यांनी नागपूर विद्यापीठातून बीए आणि एलएलबी पदवी घेतली आहे. शरद अरविंद बोबडे 29 मार्च 2000 रोजी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सदस्य झाले.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून 16 ऑक्टोबर 2012 रोजी शपथ घेतली. त्यानंतर 12 एप्रिल 2013 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 12:41 PM IST

ताज्या बातम्या