मराठमोळ्या शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ, पाहा VIDEO

मराठमोळ्या शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ, पाहा VIDEO

सर्वोच्च न्यायालयाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून मराठमोळ्या शरद अरविंद बोबडे यांनी शपथ घेतली.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : सर्वोच्च न्यायालयाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून मराठमोळ्या शरद अरविंद बोबडे यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली. सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांचा शपथविधी सोमवारी सकाळी राष्ट्रपती भवनात पार पडला. सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी सेवानिवृत्त झाले.  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक निकालांमध्ये न्यायाधीश शरद बोबडे यांची महत्वाची भूमिका होती. अयोध्या प्रकरणी निकालप्रक्रियेतीही ते निकाल देणाऱ्या 5 न्यायाधीशांपैकी एक होते.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती.भारताच्या सरन्यायाधीश पदी न्यायमूर्ती एस ए बोबडे यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.वाय वी चंद्रचूड यांच्यानंतर सरन्यायाधीश होणारे बोबडे दुसरे मराठी व्यक्ती ठरले आहेत. न्यायमूर्ती बोबडे हे 47 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. 23 एप्रिल 2021 पर्यंत बोबडे सरन्यायाधीश पदी असणार आहेत.

बोबडे यांचा 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात जन्म झाला. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. बोबडे महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू देखील आहेत. बोबडे यांनी नागपूर विद्यापीठातून बीए आणि एलएलबी पदवी घेतली आहे. शरद अरविंद बोबडे 29 मार्च 2000 रोजी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सदस्य झाले.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून 16 ऑक्टोबर 2012 रोजी शपथ घेतली. त्यानंतर 12 एप्रिल 2013 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.

सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या घटनापीठाचे अध्यक्ष होते. 2018 मध्ये तेव्हाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरुद्ध ऐतिहासिक पत्रकार परिषद घेणाऱ्या चार न्यायाधीशांपैकी ते एक आहेत. रंजन गोगोई हे 46 वे सरन्यायाधीश आहेत. 1978 साली वकिली सुरु करणाऱे गोगोई 2001 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2011 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. पुढे वर्षभरात ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. या कार्यकाळात निवडणूक ते आरक्षण सुधारणा यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या निर्णय प्रक्रियेत रंजन गोगोई होते.

संसदेत हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू, 'या' मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2019 10:00 AM IST

ताज्या बातम्या