मराठी बातम्या /बातम्या /देश /

अवघ्या एका नाण्यामुळे नशीब फळफळलं! 1400 च्या बदल्यात मिळाले 138 कोटी

अवघ्या एका नाण्यामुळे नशीब फळफळलं! 1400 च्या बदल्यात मिळाले 138 कोटी

 जाणून घ्या या दुर्लभ नाण्याची (Rare Coin) अनोखी कहाणी.

जाणून घ्या या दुर्लभ नाण्याची (Rare Coin) अनोखी कहाणी.

जाणून घ्या या दुर्लभ नाण्याची (Rare Coin) अनोखी कहाणी.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 9 जून : Viral News: अनेकदा सर्वसाधारण दिसणाऱ्या गोष्टीतही गूढ लपलेल्या गोष्टी बाहेर येतात. अमेरिकेत (America) अवघ्या 20 डॉलर म्हणजेच 1400 रुपयांच्या एका नाण्याची कोटींमध्ये बोली लागली होती. कोणी असा विचारही केला नसेल. मात्र नाण्याची ओळख पटली तेव्हा त्याच्या लिलावाची किंमत वाढली. सोन्याच्या या नाण्याचा (Gold Coin) लिलाव कोटींमध्ये झाला होता. जाणून घ्या या दुर्लभ सोन्याच्या नाण्याची (Rare Coin) अनोखी कहाणी.

नाण्याने तोडले सर्व रेकॉर्ड

न्यूयॉर्क (New York) मध्ये मंगळवारी 1933 च्या डबल ईगल सोन्याच्या नाण्याचा (Double Eagle Coin) लिलाव झाला होता. या नाण्याच्या लिलावाने आतापर्यंत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. या अत्यंत साधारण दिसणाऱ्या खास नाण्याची $18.9 मिलियन म्हणजेच तब्बल 138 कोटींमध्ये विक्री करण्यात आली आहे. Reuters मधील वृत्तानुसार, या डबल ईगल सोन्याच्या नाण्यासह (Double Eagle Gold Coin) जगातील सर्वात दुर्लभ तिकीटदेखील (World's Rarest Ticket) तब्बल 60 कोटी रुपयांमध्ये विकलं गेलं आहे.

हे ही वाचा-रस्त्यावर तडफडत होतं झुरळ; त्याला वाचवण्यासाठी तरुणाने थेट गाठलं हॉस्पिटल

100 कोटींची होती अपेक्षा

कायदेशीर बाबतीत विचार केला तर डबल ईगलचं हे नाणं (Double Eagle Coin) एका व्यक्तीकडे होतं. Sotheby Auction मध्ये याचा लिलाव होण्याची शक्यता असून (Auction) अपेक्षा आहे की हे नाणं 73 कोटी ते 100 कोटींदरम्यान विकलं जाऊ शकेल. मात्र या नाण्याच्या किंमतीने (Double Eagle Coin Price) नवीन रेकॉर्ड केला आहे. हे नाणं शू डिजायनर (Shoe Designer) आणि कलेक्टर स्टुअर्ट वीट्समॅन द्वारा विकण्यात आला, ज्यांनी 2002 मध्ये हे नाणं 55 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.

डिजाइनमुळे नाण्याची किंमत वाढली

20 डॉलर डबल ईगल सोन्याच्या या नाण्यावर (Double Eagle Coin) एकीकडे उडणाऱ्या ईगलचं डिजाइन (Eagle Design) आहे तर दुसरीकडे पुढे सरकत असताना लिबर्टी (Liberty) चं चित्र आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राज्य अमेरिकेत प्रचलनासाठी शेवटचं सोन्याचं नाणं असल्यामुळे याची किंमत इतकी वाढली आहे.

First published: