Home /News /national /

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांनाच ठेवलंय ओलीस, छतावर चढून करतोय हवेत गोळीबार

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांनाच ठेवलंय ओलीस, छतावर चढून करतोय हवेत गोळीबार

News 18 bangla

News 18 bangla

एकीकडे लॉकडाऊनच्या काळात पोलीस कर्मचारी दिवस रात्र नागरिकांची सेवा करत असताना पश्चिम बंगालमध्ये एका पोलिसाने इतर सहकाऱ्यांना ओलिस ठेवल्याचा प्रकार घडला आहे.

    कोलकाता, 23 एप्रिल : देशात लॉकडाऊन असताना पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. एकीकडे लॉकडाऊनच्या काळात पोलीस कर्मचारी दिवस रात्र नागरिकांची सेवा करत असताना पश्चिम बंगालमध्ये एका पोलिसाने इतर सहकाऱ्यांना ओलिस ठेवल्याचा प्रकार घडला आहे. पोलिस स्टेशनच्या छतावर उभा राहून आतापर्यंत जवळपास 15 गोळ्या हवेत झाडल्याचं समजतं. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, झारग्राम पोलीस लाइनमध्ये ज्युनिअर कॉन्स्टेबल विनोद कुमारने गोळ्या झाडल्या आहेत. काही महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना त्यानं ओलीस ठेवलं आहे. पोलिस छतावर असून त्यानं आतापर्यंत 15 राउंड झाडले आहेत. पोलिस दलाला परिसरात जाण्यापासून त्यानं बंदुकीच्या धाकाने अडवलं आहे. सध्याच्या परिस्थितीत फोर्सकडून पोलीस लाइनमध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसाने असं का केलं तसंच नेमके किती लोक त्यानं ओलीस ठेवले आहेत याची माहिती मिळू शकली नाही. हे वाचा : 'वाईन शॉप्स ते राज्याची तिजोरी' राज ठाकरेंनी दिला उद्धव ठाकरेंना सल्ला एकीकडे लॉकडाऊनच्या काळात लोकांची सेवा करण्यासाठी पोलिस खातं दिवस रात्र झटत आहे. अशा वेळी एका पोलिस कर्मचाऱ्यानेच सहकाऱ्यांना असं ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. हे वाचा : लॉकडाऊनमुळे असा बदलला भारत, NASA ने शेअर केले सॅटेलाइट PHOTO संकलन, संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: West bengal

    पुढील बातम्या