जुनैदचा खुनी जेरबंद

जुनैदचा खुनी जेरबंद

पोलिसांनी हेही सांगितलं की आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.

  • Share this:

09जुलै: जुनैद खान हत्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला अखेर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातून अटक करण्यात आलीय. हरियाणा रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केलीय.पोलिसांनी हेही सांगितलं की आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.

जुनैद या १६ वर्षीय मुलाची गाझियाबाद-मथुरा ईएमयू ट्रेनमध्ये २२ जून रोजी हत्या करण्यात आली होती.या हत्येचं कारण जुनैद बीफ घेऊन प्रवास करत होता असं सांगण्यात आलंय. या हत्येनंतर देशभरात तीव्र पडसाद उमटले होते.राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनीच या घटनेचा निषेध करून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे आरोपींना जेरबंद करण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं

ज्या डब्यात हत्या झाली तो डबा लोकांनी पूर्ण भरला होता तरीही पोलिसांना खूनाबद्दल सांगू शकेल असा एकही साक्षीदार अजूनही  मिळालेला नाही. या खटल्यात आतापर्यंत 5जणांना अटक झालीय. त्यातही मुख्य आरोपीला अटक झाल्यामुळे पोलिसांनी सुटकेला निश्वास टाकलाय.

22 जूनला जुनैद आपल्या भावंडांसोबत ईदसाठी खरेदी करून दिल्लीहून त्याच्या गावी परत जात होता. तेव्हा ट्रेनमध्ये जमावानं त्याची हत्या केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2017 10:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading