बापरे! गंगेत सापडला 18 किलोचा जम्बो मासा, किंमत वाचून व्हाल थक्क

बापरे! गंगेत सापडला 18 किलोचा जम्बो मासा, किंमत वाचून व्हाल थक्क

माशाची किंमत वाचून तुम्ही हा मासा खायचा विचारही करणार नाही.

  • Share this:

कोलकाता, 22 नोव्हेंबर : भारतात मोठ्या प्रमाणात लोक मांसाहार करतात. यात पश्चिम बंगाल म्हटलं की मासेप्रिय राज्य असेच चित्र डोळ्यासमोर येते. पश्चिम बंगालमध्ये जवळ जवळ रोजच्या आहारात मासे खाल्ले जातात. मात्र एका माशासाठी तुम्ही कोणी 14 हजार मोजले आहेत असे ऐकले आहे का? नाही ना. मात्र असा प्रकार घडला आहे.

पश्चिम बंगालच्या हावडा येथील उलुबेरिया जिल्ह्यात चक्क 18 किलो 500 ग्रामचा जम्बो भेटकी मासा (jumbo Bhetki fish) पकडण्यात आला होता. बंगाली वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उलुबेरिया येथील स्थानिक रहिवाशी तरूण बेरा आपल्या मित्रांसमवेत मासे पकडत होते. अचानक त्यांच्या जाळ्यात तब्बल 18 किलोचा मासा अडकला. या माश्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.

वाचा-कोणीतरी आवरा हिला! सारा अली खानचे काळ्या-निळ्या लिपस्टिकमधील PHOTO VIRAL

तरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जेव्हा मासा पकडला तेव्हा हा कोणत्या प्रकारचा आहे, याची काहीच माहिती नव्हती. पण वजन केल्यानंतर कळले की हा मासा 18 किलो 500 ग्रामचा आहे. त्यानंतर मी हा मासा फुलेश्वर बाजारात घेऊन गेलो”, असे सांगितले.

वाचा-खूशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

Loading...

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जम्बो माशासाठी खास लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. यात माशावर 10 हजारांच्यावर बोली लावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एक स्थानिक मच्छीमाऱ्यानं या माशाला 12 हजारांना विकत घेतला. त्याच्या म्हणण्यानुसार बाजरात या माशाची किंमत 13-14 हजार रुपये आहे.

वाचा-नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 40 महिलांची केली सुटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...