सरन्यायाधीशांनी स्वत:वरचे लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले

सरन्यायाधीशांनी स्वत:वरचे लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले

सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 एप्रिल : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. हा आरोप फेटाळून लावत त्यांनी उत्तर देण्याचं नाकारलं. सरन्यायाधीश गोगोई म्हणाले की, न्यायसंस्था धोक्यात आहे. पुढच्या आठवड्यात काही महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी असून मुद्दाम अशा प्रकारचे आरोप केले जात आहे.

एका महिलेने सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यावर सर्वोच्च न्यायाल्याने विशेष सुनावणी गेतली. यावेळी गोगोई यांनी सांगितले की, 20 वर्ष न्यायसंस्थेत काम केल्याचं हे फळ आहे की? 20 वर्षांच्या सेवेनंतर माझ्या खात्यात 6 लाख 80 हजार रुपये आहेत. न्यायसंस्थेला बळीचा बकरा करता येणार नाही. लोकांना ही संस्था बरखास्त करायची आहे. यासाठीच अशाप्रकारचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असं गोगोईंनी सांगितले.

रावसाहेब दानवे माझी मेहबूबा, खोतकरांच्या वक्तव्याने प्रचारसभेत हशा

First published: April 20, 2019, 11:56 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading