उद्या कुणी म्हणू नये आम्ही आत्मा विकला म्हणून देशासमोर आलो, न्यायमूर्तींचं रोखठोक पत्र

उद्या कुणी म्हणू नये आम्ही आत्मा विकला म्हणून देशासमोर आलो, न्यायमूर्तींचं रोखठोक पत्र

आम्ही चार जण सरन्यायाधीशांकडे गेलो. त्यांना विनंती केली की, काही गोष्टी व्यवस्थित होत नाहीयत. त्यामुळे त्यात लक्ष घालायला हवं. पण दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायाधीश विनंती करत असतानाही त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही.

  • Share this:

12 जानेवारी : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले.

या पत्रकार परिषदेत न्यायमूर्तींनी एक पत्रक प्रसिद्ध केलं. यात त्यांनी म्हटलंय. "देशातल्या इतिहासातला ही असाधारण घटना आहे. ही पत्रकार परिषद घेताना आम्हाला आनंद होत नाहीये. पण सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनाचं कामकाज नीट होत नाहीये. गेल्या काही महिन्यांत काही गोष्टी घडल्या त्या योग्य नव्हत्या असा आरोपच न्यायमूर्तींनी केला.

तसंच एक जबाबदारी म्हणून आमच्यासारख्या ज्येष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना काही गोष्टी योग्य होत नसल्याचं आणि त्यावर उपायांची गरज असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही. ही व्यवस्था टिकल्याशिवाय कोणत्याही देशातली लोकशाही व्यवस्था टिकणार नाही. सुदृढ लोकशाहीसाठी त्या देशातली न्यायव्यवस्था स्वायत्त असणं गरजेचं असतं असं ठाम मतही त्यांनी व्यक्त केलं.

'सरन्यायाधीशांनी दुर्लक्ष केलं'

आम्ही चार जण सरन्यायाधीशांकडे गेलो. त्यांना विनंती केली की, काही गोष्टी व्यवस्थित होत नाहीयत. त्यामुळे त्यात लक्ष घालायला हवं. पण दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायाधीश विनंती करत असतानाही त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही. त्यामुळे आम्हाला देशासमोर यावं लागलं. 20 वर्षांनंतर असं कुणी म्हणायला नको की आमच्यासारख्या ज्येष्ठ न्यायाधीशांनी आपला आत्मा विकला होता. त्यामुळेच आम्ही हे सर्व देशातल्या लोकांसमोर माडलं.

दरम्यान, देशाची माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेवर सडकून टीका केलीये. या सगळ्या प्रकरणांमुळे न्यायव्यवस्थेच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशी भीती त्यांनी बोलून दाखवलीय.

First published: January 12, 2018, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading