S M L

आॅर्डर..आॅर्डर..;सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टांच्या न्यायाधीशांना दुप्पट पगारवाढ !

"मुख्य न्यायाधीशांना महिन्याला 2.80 लाख पगार मिळणार आहे. आधी हाच पगार 1 लाख रुपये इतका होता"

Sachin Salve | Updated On: Jan 30, 2018 10:57 PM IST

आॅर्डर..आॅर्डर..;सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टांच्या न्यायाधीशांना दुप्पट पगारवाढ !

30 जानेवारी : सुप्रीम कोर्ट आणि 24 हायकोर्टांच्या न्यायाधीशांच्या पगार तब्बल 200 टक्के म्हणजेच दुप्पट होणार आहे. केंद्र सरकारने 27 जानेवारीला एक पत्रक प्रसिद्ध केलंय. त्यानुसार मुख्य न्यायाधीशांना महिन्याला 2.80 लाख पगार मिळणार आहे. आधी हाच पगार 1 लाख रुपये इतका होता. वाढीव पगारासह सरकारी निवास, सेवक आणि इतर सुविधाही मिळणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती आणि सर्व हायकोर्टांच्या मुख्य न्यायाधीशांना महिन्याला 2.50 लाख पगार मिळणार आहे. आतापर्यंत हा पगार 90 हजार इतका होता. त्यांना कॅबिनेट सचिव, कॅग, सीईसी सारख्या अधिकाऱ्यांप्रमाणे समान सुविधा मिळणार आहे.

तर हायकोर्टाच्या न्यायाधीशांना आतापर्यंत 80 हजार पगार मिळत होता. आता त्यांना 2.25 लाख पगार मिळणार आहे. हायकोर्टाच्या न्यायाधीशांनाही केंद्र सरकारच्या सचिव स्ताराच्या अधिकाऱ्याप्रमाणे सुविधा मिळणार आहे.

केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय खंडपीठाच्या न्यायाधीशांसह निवृत्त न्यायाधीशांनाही लागू होणार आहे. नवीन पगार वाढ ही 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आलाय.

2016 मध्येही पगारवाढीची झाली होती मागणी

2016 मध्ये तत्कालीन सीजेआई टीएस ठाकूर यांनी सरकारला पत्र लिहून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा पगार वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर तीन न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने याबद्दलचा अहवाल मागील वर्षी सरकारकडे सुपूर्द केला होता. या अहवालात 3 लाख पगार आणि अन्य सुविधांची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2018 10:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close