S M L

सलमानला शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाचं प्रमोशन?

सलमानला शिक्षा सुनावणाऱ्या या न्यायाधीशाचं नाव आहे देवकुमार खत्री. देवकुमार खत्री हे राजस्थानच्या फालोदी जिल्ह्याचे रहिवाशी आहेत

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 5, 2018 06:57 PM IST

सलमानला शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाचं प्रमोशन?

05 एप्रिल: आज जोधपूर न्यायालयात  सलमान खानला वन्य जीव संरक्षण कायद्याअंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली . पण ज्या न्यायाधीशाने सत्र न्यायालयात शिक्षा सुनावली  त्याचं लवकरच प्रमोशन होऊ शकतं अशी चर्चा  सध्या सुरू आहे.

सलमानला शिक्षा सुनावणाऱ्या या न्यायाधीशाचं नाव आहे देवकुमार  खत्री. देवकुमार खत्री हे राजस्थानच्या फालोदी जिल्ह्याचे रहिवाशी आहेत.  सप्टेंबर 2017 पासून या खटल्याचं कामकाज ते पाहत आहेत. खरं तर गेल्या वेळच्या  बढतीच्या यादीत त्यांचं नाव होतं. पण काही कारणाने त्यांचं प्रमोशन होऊ शकलं नव्हतं. पण आता डी.जे पदी त्यांची बढती लवकरच होऊ शकते अशी चर्चा होऊ शकते. आज निकाल देताना  त्यांनी खूप कठोर शब्दात ताशेरे सलमान खानवर ओढले आहेत. 1998 साली झालेल्या काळवीट शिकार प्रकरणाची आज सुनावणी झाली. या प्रकरणी उरलेल्या सर्व कलाकारांची निर्दोष सुटका झाली तर सलमानला मात्र 5 वर्षांची शिक्षा  आणि 10,000 रूपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.

आता या न्यायाधीशाचं खरंच प्रमोशन होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2018 06:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close