न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच - सुप्रीम कोर्ट

न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच - सुप्रीम कोर्ट

लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आता या प्रकरणात कुठलीच स्वतंत्र चौकशी होणार नाही.

  • Share this:

19 एप्रिल : न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आता या प्रकरणात कुठलीच स्वतंत्र चौकशी होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा लोया प्रकरणासंबंधीच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस धनंजय चंद्रचूड आणि जस्टिस अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निकाल दिलाय. दरम्यान, विरोधकांनी मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबाबत असमाधान व्यक्त केलंय.

न्यायाधीश लोया यांचा 1 डिसेंबर 2014ला नागपुरात हृदयविकाराने मृत्यू झाला होता. तेव्हा ते त्यांच्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जात होते. नोव्हेंबर 2017मध्ये, त्यांच्या बहिणीने लोया यांच्या मृत्यूवर शंका व्यक्त केली होती. लोया यांच्या बहिणीच्या मतानुसार, लोया यांचा मृत्यू हा सोहराबुद्दीन चकमकीशी जोडला गेला आहे.

त्यानंतर लोया यांच्या मृत्यूप्रकरणी तपास करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली जावी अशी याचिका काँग्रेस नेते तेहसीन पूनावाला यांनी केली होती. यात पत्रकार बीएस लोने, बॉम्बे लॉअर असोसिएशनसह इतरांनीही न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या चौकशीसाठी विरोधी पक्षांच्या एकूण १२० खासदारांनी आपल्या सह्यांची एक याचिकाच राष्ट्रपतींकडे पाठवली आहे. न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे जाणणे गरजेचे असून या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी व्हायला हवी असे विरोधी पक्षांच्या खासदारांचे म्हणणे होतं. पण सुप्रीम कोर्टाने या सर्व याचिका फेटाळल्या आणि न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिक आहे असा निर्णय दिला आहे.

कोर्ट काय म्हणालं?

कोर्टाच्या अधिकाऱ्यांवर अविश्वास ठेवण्यासारखं काहीही नाही

काहीही संबंध नसलेल्या केसेसचा अभ्यास करून दुष्यंत दवे यांनी कोर्टाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत

याचिकाकर्त्यांनी कोर्टाच्या प्रतिमेला केवळ मलिन केलं आहे

विशिष्ट हेतुपुरस्सर याचिका मोडीत काढण्यात याव्यात

व्यावसायिक आणि राजकीय वाद कोर्टात आणू नये

याचिकाकर्त्यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उभं केलं

मात्र हे सगळं कोर्टाच्या नियमांविरोधात आहे

जस्टीस लोयांचा मृत्यू नैसर्गिकच होता यावर दुमत नाही

त्यामुळे जज लोयांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळण्यात येत आहेत

संबंधित बातम्या

जस्टिस लोया यांचा मृत्यू ह्रदयविकारानंच; नागपूर पोलिसांचं स्पष्टीकरण

न्या.लोया मृत्यू प्रकरणी आमचा कुणावरच आक्षेप नाही - अनुज लोयाचं स्पष्टीकरण

First published: April 19, 2018, 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading