जेपी नड्डा असतील नवे BJP अध्यक्ष, आजपासून घेणार अमित शहांची जागा

जेपी नड्डा असतील नवे BJP अध्यक्ष, आजपासून घेणार अमित शहांची जागा

भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जागी सोमवारी नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जानेवारी : भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जागी सोमवारी नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे.  भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची निवड निश्चित समजली जात आहे.  जेपी नड्डा हे 20 जानेवारी रोजी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी सर्व राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते नड्डा यांच्या समर्थनासाठी नवी दिल्लीतील भाजप कार्यालयात पोहोचणार आहे. जेपी नड्डा हे भाजपच्या अध्यक्षपदासाठी गेल्या अनेक काळापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मर्जीतले म्हणून ओळखले जातात.

रविवारी झालेल्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री विजय रूपाणी, मुख्यमंत्री   त्रिवेंद्र रावत, धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकुर, यूपी भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सह अन्य मोठे नेते हजर होते. जेपी नड्डा यांची राजकीय सुरुवात ही महाविद्यालयीन राजकारणापासून सुरू झाली. अनेक वर्षांपासून त्यांना संघटनेचा अनुभव आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले नड्डा यांची  संघाशीही (RSS) त्यांची चांगली जवळीक आहे. भाजपचे वरिष्ठ नेता राधामोहन सिंह (Radhamohan Singh) हे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठीच्या प्रक्रियेत प्रभारी आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहे आणि त्यानंतर निवड प्रक्रिया सुरू होईल.

अशी होते भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड

भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवड ही सर्व सहमतीने आणि कोणत्या लढतीविना बिनविरोध होण्याची परंपरा आहे. यावेळीही हीच परंपरा कायम राखली जाणार आहे. नवीन अध्यक्षाच्या निवडीसह पक्षातील मागील अध्यक्ष अमित शहा यांच्या साडेपाच वर्षांपेक्षाचा कार्यकाळ संपुष्टात येईल. शहा यांचा कार्यकाळ हा निवडणुकांसाठी सर्वात चांगला कार्यकाळ होता. परंतु, काही राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा सामनाही करावा लागला.

जुलै महिन्यात कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांची निवड झाली होती. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमित शहा यांची गृहमंत्रिपदी निवड झाली. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यासाठी नावांचा शोध सुरू होता. कारण आतापर्यंत पक्षात 'एक व्यक्ती एक पद' ही परंपरा पहिल्यापासून कायम आहे.

लोकसभा निवडणुकीत यूपीचे नेतृत्त्व

नड्डा यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत राजकीय रुपाने महत्त्वपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या निवडणूक अभियानाच्या प्रभारी म्हणून जबाबदारी सांभळली.  या काळात त्यांनी  सपा आणि बसपाच्या  महागठबंधन कडवी झुंज दिली.भाजपने उत्तर प्रदेशमध्ये 80 जागांपैसी 62 ठिकाणी विजय मिळवला. तसंच नड्डा हे मोदी सरकारच्या पहिल्या टर्मध्ये कॅबिनेट मंत्री सुद्धा होते. तसंच संसदीय बोर्डाचे सदस्य राहिले आहे. त्यामुळेच अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

First published: January 19, 2020, 11:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading