आसाममध्ये बेबी एलिफंटच्या 'या' करामतीमुळे ट्रॅफिक जाम

आसाममध्ये बेबी एलिफंटच्या 'या' करामतीमुळे ट्रॅफिक जाम

परंतु हत्तीच्या या करामतीमुळे आसामच्या एका रस्त्यावरील वाहतूक तब्बस अर्धा तास खोळंबली होती.

  • Share this:

24 मे : क्रिकेट असो किंवा फुटबॉल यांसारख्या खेळांनी आपल्यावर नेहमीच मोहिनी घातलीय. फुटबॉल हा खेळ खेळण्याचा आपल्याला कधी ना कधी मोह होतोच. पण हा मोह हत्तीलाही होवू शकतो का? तर त्याचं उत्तर 'हो' असं आहे. कारण आसाममध्ये अशीच घटना घडलीय आणि या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक हत्ती चक्क फुटबॉल खेळताना दिसतोय. अर्थात या हत्तीने एका प्लास्टिक कंटेनरलाच आपला फुटबॉल बनवलाय.

परंतु हत्तीच्या या करामतीमुळे आसामच्या एका रस्त्यावरील वाहतूक तब्बस अर्धा तास खोळंबली होती. काही प्रवाशांना या हत्तीमुळे आपला मार्गच बदलावा लागला. तर इतरांनी हत्तीचा हा फुटबॉल खेळ संपण्याची वाट पाहणे पसंत केले. त्यातच काहीजणांनी या बेबी एलिफंटला खेळताना पाहून, त्याचा आनंद लूटण्याचा निर्णय घेतला.

आपल्या मित्रांसोबत सोबत रोड ट्रिपवरून घरी परतत असताना अकशोई गोगई नावाच्या तरुणाने काढला आहे. तर केटर्स TV ने हा व्हीडिओ यू-ट्यूब वर शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 60 हजारांपेक्षा जास्त व्हियूज मिळाले आहेत.

First published: May 24, 2017, 4:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading