मथुरा, 26 नोव्हेंबर : लग्नाच्या दिवशी नवरदेवाचा थाटचं वेगळा असतो. त्याचे कपडे...त्याच्याभोवती लोकांची गर्दी...नवरदेवही जरा तोऱ्यातच असतो. प्रत्येकजण आपल्या लग्नाचा दिवस इन्जॉय करतो. मात्र दुधात मिठाचा खडा पडावा त्याप्रमाणे या नवरदेवासाठी त्याच्या वरातीत घडलेला प्रकार त्रासदायक ठरला आहे. त्याचं झालं असं की, नवरदेव घोड्यावर बसला होता. समोर बँडवाला दणक्यात वाजवत होता. दरम्यान ही वरात पोलीस स्टेशनसमोर जात होती, तेव्हा पोलिसांनी त्यांना त्याच वेळी पकडल आणि नवरदेवाच्या आनंदावर विरजण पडलं.
ही घटना मथुऱ्यातील पोलीस ठाणे कोसीकला क्षेत्रातील आहे. येथे वस्तीतून लग्नाची वरात जात होती, नवरदेव घोड्यावर बसला आणि बँडवाल्याने एका चित्रपटाच्या गाण्यावर वाजवायला सुरुवात केली. ही वरात कोसीकला पोलीस ठाण्याच्या समोरुन जात होती. बाहेर सुरू असलेला गोंधळ पाहून पोलीस अधिकारी चिडले. त्यांनी तत्काळ हा गोंधळ थांबवण्यास सांगितलं आणि त्या बँडवाल्यांनाही ठाण्यात बोलावलं. हे पाहून नवरदेवाच्या चेहऱ्यावरील चकाकी गायब झाली. वरातीतील बँडवाल्यांना पोलिसांनी पकडलं ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि मग काय बिचारा नवरदेव कार्यालयात पोहोचण्याआधीत घोड्यावरुन उतरला.
हे ही वाचा-पत्नीचं कारण देत तरुणाने स्वत:च गुप्तांगचं कापलं; त्याच ब्लेडने गळ्यावर केले वार
केवळ विवाह कार्यालयाजवळच वाजवायचं
या प्रकरणाची माहिती मिळताच परिसरातील नागरिक पोलीस ठाण्यात पोहोचले आणि कसबसं हे प्रकरण शांत केलं. बऱ्याच वेळानंतर पोलिसांनी बँडवाल्यांना माफी मागितल्यानंतर सोडून दिलं. त्यांनी रस्त्यावर बँड वाजवायचा नाही असं त्यांच्याकडून वदवून घेण्यात आलं. सध्या देशात कोरोनाचं संकट आहे. दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. एसएचओ प्रमोद पवार यांनी सांगितलं की, केवळ विवाह कार्यालयाजवळच बँड वाजवावा..रस्त्यावर नाही. त्यांनी सांगितलं की, पकडलेल्या लोकांना वॉर्निंग देऊन सोडण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Marriage