जनार्दन रेड्डींकडून काँग्रेस आमदाराला लाच,काँग्रेसने आॅडिओ टेप केली जाहीर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 18, 2018 11:15 PM IST

जनार्दन रेड्डींकडून काँग्रेस आमदाराला लाच,काँग्रेसने आॅडिओ टेप केली जाहीर

कर्नाटक, 18 मे : कर्नाटकात घोडेबाजाराला ऊत आला असताना काँग्रेसने एक आॅडिओ क्लिप प्रसिद्ध केलीये. यामध्ये मायनिंग माफिया जनार्दन रेड्डी हे काँग्रेसच्या आमदाराला मंत्रिपदाची लाच देत असल्याचं उघड झालंय.

या आॅडिओ क्लिपमध्ये रेड्डी हे वाल्मिकी समुदायाचे प्रमुख नेता रायचूर ग्रामीणचे आमदार बासनगौडा दड्डाल यांच्याशी फोनवर संवाद साधत होते. दड्डाल पहिले बीएसआरचे काँग्रेसचे सदस्य होते. मायनिंग माफिया जनार्दन रेड्डी हे येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय समजले जातात.

या आॅडिओ क्लिमध्ये वारंवार रेड्डी हे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत आमदाराच्या बैठकीबद्दल आश्वासन देताय. पण दड्डाल यांनी आता आमचा निर्णय बदलू शकत नाही. काँग्रेसने आम्हाला कठीण वेळी मदत केलीये.

पण तरीही रेड्डी सोबत देण्यात दबाव टाकत आहे. जर तुम्ही आमच्यासोबत आला तर खूप प्रगती कराल अगदी 100 टक्के प्रगती करशाल असं  आश्वासन रेड्डी यांनी दिलं.

विशेष म्हणजे, भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना 100 कोटींची आॅफर देण्यात आली असा आरोपही कुमारस्वामींनी केला होता. तसंच काँग्रेसचे आमदार आनंद सिंह यांचं भाजपच्या नेत्याने अपहरण केलं असा आरोप सिद्धरामय्यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2018 11:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close