जॉनसन बेबी पावडरमुळे कॅन्सरचा धोका? कंपनीने परत घेतले 33 हजार डबे

जॉनसन बेबी पावडरमुळे कॅन्सरचा धोका? कंपनीने परत घेतले 33 हजार डबे

जॉनसन बेबी पावडरमध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थाचा अंश आढळल्यानं अमेरिकन बाजारातून जवळपास 33 हजार डबे कंपनीने परत मागवले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : बेबी प्रॉडक्टच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहचलेली अमेरिकन कंपनी जॉनसन अँड जॉनसन आता वादात अडकली आहे. कंपनीने अमेरिकेतून जवळपास 33 हजार बेबी पावडरचे डबे परत घेतले आहेत. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार बेबी पावडरच्या नमुन्यात एस्बेस्टसचा अंश आढळला आहे.

एस्बेस्टस हे एक धोकादायक कार्सिनोजेन आहे. यामुळे कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच अमेरिकेत अशा प्रॉडक्टमध्ये एस्बेस्टसचा अंश आढळला आहे. तर कंपनीनेदेखील पहिल्यांदाच त्यांच्या बेबी पावडरच्या प्रॉडक्टला बाजारातून परत घेतलं आहे. दरम्यान, या बातमीनंतर अमेरिकन शेअर बाजारात जॉनसन अँड जॉनसनच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 127.70 डॉलर इतक्या किंमतीवर बाजार बंद झाला.

अमेरिकन फार्मा कंपनी जॉनसन अँड जॉनसनची बेबी पावडर, शॅम्पू आणि साबण हे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वापरले जातात. लहान मुलांसाठी असलेल्या प्रॉडक्टचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. दरम्यान, कंपनीला त्यांच्या अनेक प्रॉडक्टमुळे तक्रारी आणि दंडही भरावा लागला आहे. एका व्यक्तीने कंपनीच्या उत्पादनावर प्रश्न उपस्थित करत न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये जॉनसन अँड जॉनसनला दोषी ठरवत 8 बिलियन डॉलरचा दंड केला आहे.

भारतातही जॉनसन अँड जॉनसन बेबी शॅम्पूमध्ये अशा प्रकारच्या पदार्थाचे अंश सापडले होते. एप्रिलमध्ये राजस्थान ड्रग कंट्रोलच्या रिपोर्टमध्ये बेबी शॅम्पूमध्ये कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटक आढळले होते. यानंतर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने शॅम्पूची विक्री थांबवण्याचे आदेश दिले होते. तसेच सर्व प्रॉडक्ट बाजारातून मागे घेण्यसाही सांगितले होते. दरम्यान, भारतातील बेबी पावडरमध्ये कर्करोगाला कारणीभूत घटक किंवा पदार्थ आढळलेत का ? याबद्दल कोणती माहिती मिळू शकलेली नाही.

VIDEO : राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना थेट सवाल, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2019 01:58 PM IST

ताज्या बातम्या