'या' कंपनीचा शॅम्पू वापरत असाल तर सावधान, स्टॅण्डर्ड क्वालिटी टेस्टमध्ये सपशेल नापास

'या' कंपनीचा शॅम्पू वापरत असाल तर सावधान, स्टॅण्डर्ड क्वालिटी टेस्टमध्ये सपशेल नापास

लहान मुलांचा शॅम्पू बनवणारी कंपनी क्वालिटी स्टॅण्डर्ड टेस्टमध्ये नापास झाली.

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : लहान मुलांचे हेल्थ केअर प्राॅडक्ट बनवणारी कंपनी जाॅन्सन अँड जाॅन्सन (Johnson & Johnson)चा शॅम्पू तुम्ही वापरताय? मग सावधान. जाॅन्सन अँड जाॅन्सन शॅम्पू स्टँडर्ड क्वालिटीत नापास झालाय. राजस्थान ड्रग कंट्रोल आॅर्गनायझेशनला जाॅन्सन अँड जाॅन्सन शॅम्पूच्या 2 बॅचमध्ये काही गडबड जाणवलीय. या शॅम्पूत धोकादायक फार्मेल्डिहाइड असण्याचा रिपोर्ट दिलाय.

राजस्थान ड्रग कंट्रोल आॅर्गनायझेशननं जाॅन्सन अँड जाॅन्सन शॅम्पूच्या 2 बॅचची तपासणी केली. ‘BB58204’  आणि ‘BB58177’ला टेस्ट करून हा रिपोर्ट दिला होता. हे शॅम्पू सप्टेंबर 2021मध्ये एक्सपायर होतील.

कंपनीवर दाखल होऊ शकतो खटला

राजस्थान ड्रग्स वाॅचडाॅगनं नोटिसमध्ये म्हटलंय, हा माल अजिबात वापरता कामा नये. हे सर्व शॅम्पू बाजारातून काढून टाका. ड्रग्स अँड काॅस्मेटिक अॅक्ट 1940प्रमाणे राजस्थान ड्रग रेग्युलेटर त्यांच्यावर खटला चालवू शकतात.

कंपनीनं  फार्मेल्डिहाइड असल्याचं नाकारलं

जाॅन्सन अँड जाॅन्सननं शॅम्पूत  फार्मेल्डिहाइड असल्याचा नकार दिलाय.

2018मध्ये अमेरिकेत काही महिलांमध्ये जाॅन्सन अँड जाॅन्सन बेबी पावडरनं गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं दिसली होती. हा मामला कोर्टात गेला. त्यावेळी महिलांच्या वकिलानं सांगितलं की क्लाएंटसना बेबी पावडरमधल्या अस्बस्ट्समुळे गर्भाशयाचा कॅन्सर झाला. कोर्टानं 22 पीडित महिलांना 4.69 अब्ज डाॅलर्स नुकसान भरपाईचा आदेश दिला होता.

अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये वेगवेगळी केमिकल्स वापरली जातात. जनतेच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं ती तपासली जातात. त्यातून मग अशा गोष्टी बाहेर येतात. जाॅन्सन अँड जाॅन्सन ही जुनी कंपनी आहे. लहान बाळांसाठी ही कंपनी उत्पादनं बनवते.

VIDEO: अखेर चार तासानंतर बिबट्याचं पिल्लू जेरबंद

First published: April 1, 2019, 6:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading