UPSC पास न होता देखील केंद्रात सरकारी अधिकारी होता येणार

UPSC पास न होता देखील केंद्रात सरकारी अधिकारी होता येणार

UPSC परीक्षा पास न होता देखील आता केंद्रात सरकारी अधिकारी होता येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जुलै : केंद्रात सरकारी अधिकार व्हायचं असेल तर UPSC परिक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. अनेकांकडे बुद्धी आणि काम करण्याची सचोटी असते. पण, UPSC परीक्षा पास न झाल्यानं सरकारी अधिकारी होता येत नाही. पण, आता मात्र तुम्हाला UPSC परीक्षा न देता देखील केंद्रात अधिकारी होता येणार आहे. केंद्र सरकार तुम्हाला तशी संधी देत आहे. तुमच्याकडे असलेल्या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला आता केंद्रात सरकारी अधिकारी होता येणार आहे. याबाबतची जाहिरात लवकरच काढली जाणार आहे. नीती आयोगानं सध्या 44 जागांकरता अर्ज मागवले आहेत. या अर्जांची छाननी केल्यानंतर अर्जदाराच्या योग्यतेनुसार त्याची नेमणूक केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून केली जाणारी ही नियुक्ती कंत्राट तत्वावर असणार आहे. साधारण 1 लाख 5 हजार पगार व्यक्तीला निवड झाल्यानंतर मिळणार आहे.

दिल्लीच्या मँगो फेस्टिवलमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहांची विक्री

शिक्षणाची अट काय?

उमेदवाराची निवड करताना त्याचा अनुभव पाहिला जाणार आहे. शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं जाणार नाही. नीती आयोगाचं सल्लागार अलोक कुमार यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय हे 26 ते 35 वर्षे असणं गरजेचं आहे. विविध विभागांमध्ये काम करण्यासाठी ही निवड केली जाणार आहे. नीती आयोगाच्या वेबसाईटवरून याबद्दलची अधिक माहिती मिळू शकणार आहे.

रानडुकराचा दिव्यांग तरुणावर हल्ला; जीव वाचवतानाची धडपड कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 10:18 AM IST

ताज्या बातम्या