बोगस जातप्रमाणपत्र वापरणाऱ्यांची नोकरी आणि पदवीही जाणार !

बोगस जातप्रमाणपत्र वापरणाऱ्यांची नोकरी आणि पदवीही जाणार !

शिक्षणासाठी तसंच नोकरी मिळवताना बोगस जात प्रमाणपत्राचा वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास संबंधीत व्यक्तीला यापुढे नोकरी आणि पदवीही गमवावी लागणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 जुलै : शिक्षणासाठी तसंच नोकरी मिळवताना बोगस जात प्रमाणपत्राचा वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास संबंधीत व्यक्तीला यापुढे नोकरी आणि पदवीही गमवावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टानेच हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. तसंच दोषी व्यक्तीला शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. बोगस जात प्रमाणपत्राचा वापर करुन नोकरी आणि पदवी मिळवणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने चपराक लगावली. बोगस जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणारा व्यक्ती कधीपासून नोकरीवर आहे हे महत्त्वाचे ठरणार नाही.

एखादा व्यक्ती २० वर्षांपासून अधिक काळ नोकरीवर असला तरी त्याची नोकरी जाणारच. त्याला शिक्षा होणारच असं कोर्टाने स्पष्ट केलं. बरीच वर्ष नोकरीवर असले तरी अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करावीच लागेल. त्यांच्याविरोधात नरमाईची भूमिका घेता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल अशी घोषणा केली होती.

केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी मार्चमध्ये लोकसभेत याविषयीची आकडेवारीदेखील सादर केली होती. सुमारे १,८३२ जणांनी बोगस जातप्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवल्याचे त्यांनी सांगितलं होतं. यातील २७६ जणांवर निलंबनाची किंवा बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. तर १, ०३५ जणांवरील कारवाईची प्रक्रिया सुरु होती. पण काहीजणांनी या प्रक्रियेला हायकोर्टातून स्थगिती आणली होती. हायकोर्टाच्या याच निकालाविरोधात महाराष्ट्र सरकारच्यावतीने सुप्रीम कोर्टात अपील याचिका दाखल केली होती.  त्यावर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल रद्दबातल ठरवत बोगस जातप्रमाण पत्र सादर करणाऱ्यांना तात्काळ नोकरीवरून काढण्याचे निर्देश दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 04:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading