नोकरी शोधणाऱ्या 27.2 कोटी भारतीयांची खासगी माहिती लीक

नोकरी शोधणाऱ्या 27.2 कोटी भारतीयांची खासगी माहिती लीक

नोकरीच्या शोधासाठी ऑनलाईन शोधाशोध करणाऱ्या तब्बल 27.2 कोटी भारतीय तरुणांची खासगी माहिती लीक झाल्याची माहिती उघड झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : नोकरीच्या शोधासाठी ऑनलाईन शोधाशोध करणाऱ्या तब्बल 27.2 कोटी भारतीय तरुणांची खासगी माहिती लीक झाल्याची माहिती उघड झाली आहे. सिक्युरिटी रिसर्चर डिस्करीच्या रिपोर्टनुसार कोट्यवधी भारतीयांची वैयक्तिक माहिती असलेला डेटा दोन आठवडे हॅक केला गेला. त्यामध्ये असलेली माहिती मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक डेटा चोरण्यात आला असावा, असा अंदाज आहे. MongoDB डेटाबेस Amazon AWS यावरून माहिती उघड करण्यात आली.

सुरक्षा विशेषज्ज्ञ बॉब डियाचेंको यांनी सांगितलं की, 1 मे रोजी MongoDB डेटाबेस वर 275,265298 एवढ्या भारतीयांची माहिती उपलब्ध होती. ती तिथे उघडपणे आली याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. हा सगळा डेटा या डेटाबेसवर जवळजवळ दोन आठवडे पडून होता. यामध्ये प्रामुख्याने नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांशी संबंधित माहिती होती. भारतीय तरुणांची नावं, पत्ता, इ मेल आयडी, मोबाईल नंबर, शिक्षण, जन्मतारीख एवढंच नव्हे तर पगाराचा तपशीलही या माहितीमध्ये असू  शकतो. दोन आठवड्यात ही माहिती कुणीही आरामात तिथून घेऊ शकत होतं.

बॉब यांच्या म्हणण्यानुसार, हे लक्षात आल्यानंतर CERT च्या टीमला सांगण्यात आलं. 1 मे ते 8 मे दरम्यान हा डेटाबेस ओपन होता. याच वेळी हॅकर्सनी डेटा वाइप आउट केला म्हणजे काढून टाकला. MongoDB डेटाबेस हॅकर्सनी चोरण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. त्यातून किती आणि कोणता डेटा चोरीला गेला किंवा नाही याबाबत अद्याप माहिती कळलेली नाही.

First published: May 11, 2019, 8:56 PM IST

ताज्या बातम्या