S M L

कुठे गेल्या मोदींच्या 1 कोटी नोकऱ्या?

याच सरकारचे आकडे बघितले तर रोजगार निर्मितीत तब्बल 83 टक्क्यांनी घसरण झालीय आणि ही गेल्या 20 वर्षात कमी रोजगार निर्मिती आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 26, 2017 08:31 PM IST

कुठे गेल्या मोदींच्या 1 कोटी नोकऱ्या?

रफीक मुल्ला, 26 मे : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला २६ मे रोजी ३ वर्षें पूर्ण झाली. सत्तेत येताना या सरकारनं दरवर्षी १ कोटी रोजगार संधी निर्माण करण्याचं वचन दिलं होतं, मात्र याच सरकारचे आकडे बघितले तर रोजगार निर्मितीत तब्बल 83 टक्क्यांनी घसरण झालीय आणि ही गेल्या 20 वर्षात कमी रोजगार निर्मिती आहे.

आपल्या देशात नोकरी शोधणं हा तरूणांच्या जीवनातला फार महत्त्वाचा काळ मानला जातो. मनोज नारकर हा सुध्दा त्याला अपवाद नाहीये. जिथे गरज आहे तिथे सीव्ही पाठवून तो प्रयत्न करतोय. मात्र दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असल्याची जाणीव त्याला होतेय.

केंद्र सरकारतर्फेच प्रसिध्द केली गेलेली आकडेवारीच नोकऱ्या कमी झाल्याचं सांगतेय.

जिथे 2010 साली ८ लाख ७० हजार नोकऱ्या नव्याने उपलब्ध झाल्या,

तिथे 2016 मध्ये मात्र, केवळ १ लाख ३५ हजार एवढाच रोजगार निर्माण झाला.

आता आपण गेल्या 5 वर्षातील रोजगाराच्या आकडेवारीवर नजर टाकूयात

वर्ष              रोजगार

2011         ९ लाख २९ हजार

2012         ३ लाख २१ हजार

2013        ४ लाख १९ हजार

2014        ४ लाख २१ हजार

2015        १ लाख ३५ हजार

मोदी सरकारने दरवर्षी १ कोटी रोजगार निर्मितीचं वचन दिलं होतं पण परिस्थिती नेमकी याउलट आहे. केंद्र सरकारचा लेबर ब्युरो स्पष्टपणे म्हणतो की नव्या रोजगार निर्मिती होण्याच्या प्रक्रियेत तब्बल ८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

देशात ६० टक्के लोकसंख्या ही युवकांची आहे, मात्र ऑर्गनाजेशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन अन्ड डेव्हलपमेंट म्हणजेच ओईसीडी आपल्या सर्वेक्षणात म्हणते की देशातील १८ ते ३० वयोगटातील ३० टक्के युवकांना सध्या नोकऱ्या नाहीयेत.ही स्थिती बदलण्याची गरज आणि आव्हान मोदी सरकारपुढे आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2017 08:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close