Home /News /national /

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन, भारतीयांच्या खाद्यपदार्थांवर काय होणार परिणाम

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन, भारतीयांच्या खाद्यपदार्थांवर काय होणार परिणाम

अमेरिका सोयाबीनचा (Soybean) मोठा निर्यातक देश आहे. तर, भारत सोयाबीन खरेदी करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या आणि चीन (China) पहिल्या क्रमांकावर आहे.

    नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : अमेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत (US Presidential Election) जो बायडन (Joe Biden) विजयी झाले आहेत. भारतात (India) अमेरिकेसह द्विपक्षीय कराराबाबत (Bilateral Trade) बायडन यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. केवळ सोन्या-चांदीवर (Gold-Silver) नाही, तर बायडन यांच्या राष्ट्रपती बनण्यामुळे भारतीयांच्या खाण्या-पिण्यावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात होतं. विशेषत: कुकिंग ऑईलवर (Cooking Oil) याचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा होती. परंतु याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिका सोयाबीनचा (Soybean) मोठा निर्यातक देश आहे. तर, भारत सोयाबीन खरेदी करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या आणि चीन (China) पहिल्या क्रमांकावर आहे. 'मी पहिली उपराष्ट्राध्यक्ष, पण अखेरची नाही', विजयानंतर पहिल्यांदाच कमला हॅरिस यांनी जनतेला केलं संबोधित बायडन यांच्या राष्ट्राध्यपदामुळे सोयाबीन ऑईल महाग होण्याची अफवा - ऑल इंडिया एडिबल ऑइल फेडरेशनचे मंत्री शंकर ठक्कर यांनी, डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर चीन सोयाबीन खरेदीसाठी अमेरिकेसह दुसऱ्या बाजारांकडेही वळला होता. परंतु आता बायडन यांच्या येण्याने चीन पुन्हा अमेरिकेचा मोठा सोयाबीन ग्राहक ठरेल, चीनची मनमानी सुरु होऊन या खाद्य तेलाचे दर वाढतील असं म्हणणं चुकीचं ठरेल. परंतु याउलट जो बायडन यांच्या येण्यामुळे ऑइल नेक्सस खंडित होईल, कारण ट्रम्प यांच्या स्वत:च्या कंपन्याही या व्यवसायात आहेत. ट्रम्प यांच्या पदावरून जाण्यामुळे अशा कंपन्यांच्या पदड्यामागून मिळणारा फायदा बंद होईल. दुसरीकडे, कमॉडिटी मार्केटसाठी बायडन फायदेशीर ठरू शकतात. ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कमॉडिटी बाजारात जो बायडन यांच्याकडून अनेक आशा असल्याचं त्यांनी सांगितलं.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: US elections

    पुढील बातम्या