Home /News /national /

'जेएनयू' वर पुन्हा 'लाल बावटा', अभाविप दुसऱ्या क्रमांकावर

'जेएनयू' वर पुन्हा 'लाल बावटा', अभाविप दुसऱ्या क्रमांकावर

दिल्लीच्या विख्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या संघटनांच्या 'लेफ्ट युनिटी' ला स्पष्ट बहुमत मिळालंय. तर अभाविपला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानवं लागलं.

  नवी दिल्ली, ता. 16 सप्टेंबर : दिल्लीच्या विख्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या संघटनांच्या 'लेफ्ट युनिटी' ला स्पष्ट बहुमत मिळालंय. तर डाव्यांचा गड सर करण्यासाठी पूर्ण ताकद लावणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. विद्यार्थी संघाच्या चार महत्वाच्या पदांसाठी शुक्रवारी मतदान झालं होतं. नंतर मतमोजणीला सुरुवातही झाली होती. मात्र काही कारणांमुळे मतमोजणी 12 तास लांबणीवर पडली होती. या निकालांमुळे जेएनयुवरचं डाव्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. JNU च्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत विविध चार डाव्या संघटनांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. तर संघ विचारांची अभाविप, काँग्रेसची NSUI, बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट असोसिएशन (बापसा) आणि राष्ट्रीय जनता दलाची विद्यार्थी शाखा छात्र राजद निवडणुकीच्या मैदानात होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या काश्मिरवरच्या कार्यक्रमात भारत विरोधी घोषणा दिल्यामुळे जेएनयू देशभर चर्चेचा विषय झाली होती. कन्हैय्या कुमार आणि उमर खालीद हे विद्यार्थी नेते देशपातळीवर विद्यार्थी नेते म्हणून पुढे आले होते. या दोघांविरूद्धही सध्या देशद्रोहाचा खटला सुरू आहे. निकाल जाहीर झाल्यावर सर्व डाव्या विद्यार्थी संघटनांनी जल्लोष केला. तर सर्व शक्ती पणाला लावूनही अभाविपला दुसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावं लागल्यानं त्यांच्या चेहेऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. अध्यक्षपदासाठी - डाव्या संघटनांच्या एन. साई बालाजी ला 1871 तर अभाविपच्या ललित पांडे ला 937 मतं मिळाली. उपाध्यक्षपदासाठी - डाव्या संघटनांच्या सरिका चौधरीला 2309 अभाविपच्या गीता बरूआ ला 871 मतं मिळाली. महासचिवपदासाठी - डाव्या संघटनांच्या एजाज अहमद राथेर ला 2113 तर अभाविपच्या गणेश गुर्जर ला 863 मतं मिळाली. संयुक्त सचिव - डाव्या संघटनांच्या अमुथा जयदीप ला 1552 तर अभिविपच्या व्यंकट चौबेला 941 मतं मिळाली.

  VIDEO : विनोद तावडेंचा गणेशोत्सवातला अनोखा अंदाज पाहिलात का?

   
  First published:

  Tags: Abvp, Jnusu student, Left, Student election, अभाविप, जेएनयू, विद्यार्थी संघ निवडणूक

  पुढील बातम्या