Home /News /national /

JNU नंतर अहमदाबादमध्येही राडा, ABVP-NSUI कार्यकर्ते भिडले; VIDEO

JNU नंतर अहमदाबादमध्येही राडा, ABVP-NSUI कार्यकर्ते भिडले; VIDEO

गुजरातमध्ये ABVP आणि NSUI चे विद्यार्थी आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात दगडफेक आणि काठीनेही मारहण करण्यात आली.

    अहमदाबाद, 07 जानेवारी : जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेला दोन दिवस होण्याआधी आता गुजरातमध्ये ABVP आणि NSUI चे विद्यार्थी आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात दगडफेक आणि काठीनेही मारहण करण्यात आली. यामद्ये काही लोक जखमी झाले आहेत. गुजरातमधील अहमदाबादमध्ये ABVP च्या कार्यालयाच्या बाहेर JNU हिंसाचाराविरोधात आंदोलन सुरू होतं. तेव्हा NSUI आणि ABVP च्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दल या संघटनेनं स्वीकारली आहे. या संघटनेचा नेता भुपेंद्रकुमार तोमर उर्फ पिंकी चौधरीने एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. हिंदू रक्षा दलाचा अध्यक्ष असून हा हल्ला आपणच केल्याचा दावा त्याने केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत चौधरीने म्हटलं आहे की, जे कोणी लोक देशविरोधी कारवाया करतील त्यांची अवस्था जेएनयूच्या विद्यार्थ्यांसारखी होईल. जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेतो. आमच्या धर्माविरुद्ध एवढं चुकीचं बोलणं योग्य नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जेएनयु हा ड्याव्यांचा अड्डा झाला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. काय झालं होतं जेएनयू विद्यापीठात? JNU विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या साबरमती वसतिगृहाच्या टी पॉइंटवर छात्रसंघाकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. य़ाच वेळी 40 ते 50 तरुण रुमालाने चेहरा लपवलेले गुंड विद्यापीठाच्या परिसरात घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण सुरू केली. हाताला मिळणारं सामान उचलून त्यांनी तोडफोड केली. समानाचं नुकसान केलं. लोखंडी रॉडने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आणि तरुण पसार झाले. दरम्यान या घटनेनंतर अभविप आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. वाचा : 'JNU हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेतो, आमच्या धर्माविरुद्ध चुकीचं बोलणं योग्य नाही'
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या