Home /News /national /

JNU Violence: दिल्ली पोलिसांच्या 'या' निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा पेटला भडका

JNU Violence: दिल्ली पोलिसांच्या 'या' निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा पेटला भडका

New Delhi: JNU student union (JNUSU) President Aishe Ghosh leaves after speaking during a press conference in New Delhi, Monday, Jan. 6, 2020. Ghosh was on Sunday allegedly beaten by a group of masked men and women armed with sticks, rods who unleashed violence on the campus of the University. (PTI Photo/Kamal Kishore)(PTI1_6_2020_000186B)

New Delhi: JNU student union (JNUSU) President Aishe Ghosh leaves after speaking during a press conference in New Delhi, Monday, Jan. 6, 2020. Ghosh was on Sunday allegedly beaten by a group of masked men and women armed with sticks, rods who unleashed violence on the campus of the University. (PTI Photo/Kamal Kishore)(PTI1_6_2020_000186B)

हल्लेखोरांना मोकाट सोडता आणि पीडीतांवरच कारवाई करत असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांवर होतोय.

    नवी दिल्ली 07 जानेवारी : जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (JNU) झालेल्या हिंसाचार प्रकरणी सर्व देशात असंतोष निर्माण झालाय. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी होतेय. एका संघटनेनं त्याची जबाबदारीही स्वीकारलीय. तर हल्लेखोरांचा शोध सुरूच असल्याचं दिल्ली पोलिसांन सांगितलंय. रविवारी झालेल्या हल्ल्यात JNUSU ची अध्यक्ष आइशी घोष (Aishe Ghosh) जखमी झाली होती. घटनेच्या दोन दिवसांनंतर पोलिसांनी आइशी विरुद्धच FIR दाखल केलाय. या कारवाईचा निषेध करण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये आंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटली आहे. हल्लेखोरांना मोकाट सोडता आणि पीडीतांवरच कारवाई करत असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांवर होतोय. आइशी घोष आणि त्यांच्या इतर 19 सहकाऱ्यांनी 4 जानेवारीला विद्यापीठाच्या सर्व्हर रुमची तोडफोड केली आणि सामानांची नासधूस केली असा आरोप प्रशासनाने केलाय. त्या आधारे FIR दाखल करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. रविवारच्या रात्री 40 ते 50 गुंड तोंडावर कापडं बांधून विद्यापीठात घुसले होते. आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. त्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या मारहाणीत आइशा घोषच्या डोक्याला जबर मार लागला असून तिला 15 टाके बसले आहेत. हल्लेखोरांचं फुटेजही समाजमाध्यमांवर उपलब्ध असून त्यांना पकडून तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली जात असताना ज्यांना मारहाण करण्यात आली त्यांच्याविरुद्धच कारवाई करण्यात येत असल्याची टीका होतेय. JNU नंतर अहमदाबादमध्येही राडा, ABVP-NSUI कार्यकर्ते भिडले; VIDEO या संघटनेनं घेतली जबाबदारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दल या संघटनेनं स्वीकारली आहे. या संघटनेचा नेता भुपेंद्रकुमार तोमर उर्फ पिंकी चौधरीने एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. हिंदू रक्षा दलाचा अध्यक्ष असून हा हल्ला आपणच केल्याचा दावा त्याने केला आहे. केंद्राचा इशारा, ...तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत चौधरीने म्हटलं आहे की, जे कोणी लोक देशविरोधी कारवाया करतील त्यांची अवस्था जेएनयूच्या विद्यार्थ्यांसारखी होईल. जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेतो. आमच्या धर्माविरुद्ध एवढं चुकीचं बोलणं योग्य नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जेएनयु हा ड्याव्यांचा अड्डा झाला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या