मराठी बातम्या /बातम्या /देश /

JNU : कोण आहे ती हातात रॉड घेतलेली मुलगी? सोशल मीडियावर शोध सुरु

JNU : कोण आहे ती हातात रॉड घेतलेली मुलगी? सोशल मीडियावर शोध सुरु

JNU मध्ये रविवारी रात्री हातात लोखंडी रॉड घेऊन उभा असलेल्या या लोकांनीच हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि तोडफोड केली.

JNU मध्ये रविवारी रात्री हातात लोखंडी रॉड घेऊन उभा असलेल्या या लोकांनीच हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि तोडफोड केली.

JNU मध्ये रविवारी रात्री हातात लोखंडी रॉड घेऊन उभा असलेल्या या लोकांनीच हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि तोडफोड केली.

    नवी दिल्ली, 06 जानेवारी : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर तिथली परिस्थिती सांगणारे फोटो व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षदर्शींनीदेखील त्याठिकाणी कशा पद्धतीने मारहाण झाली हे सांगितलं आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या हिंसाचारावरून डाव्या संघटना आणि अभविपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. जेएनयूमध्ये चेहरा लपवून आलेल्या गुंडांनी रविवारी जवळपास 30 मिनिटं असा धुडगूस घातला. साबरमती वसतीगृहासह आजूबाजूच्या इमारतींमध्ये लोखंडी गजांनी तोडफोड केली. यासोबत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना देखील मारहाण केली. या हिंसाचारात जवळपास 20 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान जेएनयूमध्ये हिंसा कशी झाली याबाबत माहिती समोर आली आहे. विद्यापीठात घुसून कोणी मारहाण केली हे अद्याप समोर आलेलं नाही. पण यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. एकीकडे डाव्या विचारसरणी समर्थक विद्यार्थी संघटना आणि दुसरीकडे भाजप समर्थक ABVP संघटना आहे. सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. त्यात चेक्स असलेला शर्ट घातलेल्या मुलीने चेहरा कापडाने झाकलेला आहे. हातात लोखंडी रॉड घेऊन उभा असलेल्या या लोकांनीच हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि तोडफोड केली. फोटोत असलेली मुलगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. कंवलप्रीत कौरने हा फोटो ट्विट करून हा दावा केला आहे. यातील मुलीचे नाव कोमल शर्मा असल्याचंही म्हटलं आहे. या फोटोसोबत आणखी काही फोटोही शेअर केले आहेत. दरम्यान, याबाबत एबीव्हीपी किंवा इतर कोणीही माहिती दिलेली नाही. तसेच पोलिसांनीही अजुन काही स्पष्ट केलेले नाही. JNU विद्यापीठात रविवारी नेमकं काय घडलं? JNU प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या परिसरात 8 ऑक्टोबरपासून वसतिगृहाची फी वाढवल्याविरोधात छात्रसंघासोबत इतर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. फी वाढीचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सेमिस्ट परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. डाव्या संघटनांनी दोन दिवस सर्व्हर रूमवर कब्जा केला होता. त्यांनी विद्यापीठातील रजिस्ट्रेशन प्रक्रिया बंद पाडली होती. पुढच्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख रविवारी असल्यानं काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेले होते. तेव्हा डाव्या संघटनांनी त्यांना रोखलं आणि हुज्जत घातली. याच दरम्यान धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्यामुळे वातावरण थोडं तापलं. ही घटना घडत असताना काही शिक्षही तिथे उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि हिंसाचार झाला. गेल्या काही दिवसांपासून JNUमध्ये फी वाढी विरोधात आंदोलन सुरू आहे. त्यातच CAA आणि NRC विरोधात आंदोलन पेटल्याने वातावरण तापलेलं होतं. अशी परिस्थिती असताना रविवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. चेहरा लपवून आलेल्या गुंडांचा धुमाकूळ JNU विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या साबरमती वसतिगृहाच्या टी पॉइंटवर छात्रसंघाकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. य़ाच वेळी 40 ते 50 तरुण रुमालाने चेहरा लपवलेले गुंड विद्यापीठाच्या परिसरात घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण सुरू केली. हाताला मिळणारं सामान उचलून त्यांनी तोडफोड केली. समानाचं नुकसान केलं. लोखंडी रॉडने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आणि तरुण पसार झाले. दरम्यान या घटनेनंतर अभविप आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. JNUमध्ये कसा झाला हिंसाचार? विद्यापीठ प्रशासनाने सांगितली INSIDE SORY
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: JNU

    पुढील बातम्या