JNUमध्ये हैदोस घालणाऱ्या 'त्या' गुंडांची ओळख पटली, करणार जेरबंद

JNUमध्ये हैदोस घालणाऱ्या 'त्या' गुंडांची ओळख पटली, करणार जेरबंद

हे गुंड विद्यापीठात आलेच कसे असा सवाल करण्यात येत असून सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 08 जानेवारी : दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (Jawaharlal Nehru University) तोंडावर रुमाल बांधून हैदोस घालणाऱ्या गुंडांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलंय अशी माहिती सूत्रांनी दिलीय. रविवारी 40 ते 50 गुडांनी तोंडावर रुमाल बांधून विद्यापीठात प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत अनेक विद्यार्थी जखमी झालेत त्यात आइशा घोष ही विद्यार्थी नेताही जखमी झाली होती. या राड्यानंतर देशभर वादळ निर्माण झालं होतं. या गुंडांना अजुन का अटक करण्यात आली नाही असा सवाल दिल्ली पोलिसांना करण्यात येत होता. हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला असा आरोप डाव्या संघटनांनी केलाय तर हा डाव्यांचाच डाव असल्याचा आरोप ABVPने केलाय.

या मारहाणीचं फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या गुंडांच्या हातात लोखंडी रॉड आणि सळ्या होत्या. हे गुंड विद्यापीठात आलेच कसे असा सवाल करण्यात येत असून सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. त्यामुळे दिल्ली पोलीस या आरोपींना केव्हा अटक करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

ती मुलगी कोण? शोध सुरू

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर तिथली परिस्थिती सांगणारे फोटो व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षदर्शींनीदेखील त्याठिकाणी कशा पद्धतीने मारहाण झाली हे सांगितलं आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या हिंसाचारावरून डाव्या संघटना आणि अभविपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.

#boycottchhapaak ट्वीटरवर ट्रेंड, दीपिका JNUमध्ये गेल्यामुळे नेटकरी भडकले

जेएनयूमध्ये चेहरा लपवून आलेल्या गुंडांनी रविवारी जवळपास 30 मिनिटं असा धुडगूस घातला. साबरमती वसतीगृहासह आजूबाजूच्या इमारतींमध्ये लोखंडी गजांनी तोडफोड केली. यासोबत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना देखील मारहाण केली. या हिंसाचारात जवळपास 20 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान जेएनयूमध्ये हिंसा कशी झाली याबाबत माहिती समोर आली आहे.

राजकारण हे 'कबड्डी'सारखं, पाय खेचण्यात यशस्वी तो मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे

विद्यापीठात घुसून कोणी मारहाण केली हे अद्याप समोर आलेलं नाही. पण यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. एकीकडे डाव्या विचारसरणी समर्थक विद्यार्थी संघटना आणि दुसरीकडे भाजप समर्थक ABVP संघटना आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 06:11 PM IST

ताज्या बातम्या