JNUमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ, कुलगुरूंचा गंभीर आरोप

JNUमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ, कुलगुरूंचा गंभीर आरोप

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) सोमवारी रात्री विद्यार्थ्यांनी कुलगुरु एम.जगदीश कुमार यांच्या घराला घेराव घातला.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) सोमवारी रात्री विद्यार्थ्यांनी कुलगुरु एम.जगदीश कुमार यांच्या घराला घेराव घातला. विद्यार्थ्यांनी घराची देखील तोडफोड केली आणि पत्नीला घरात कैद केल्याचा आरोप कुलगुरु जगदीश कुमार यांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

JNUमधील विद्यार्थ्यांनी कुलगुरु जगदीश कुमार यांच्या घरापर्यंत सोमवारी रात्री मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांनी कुमार यांच्या घरावर मोर्चा काढला. पण मोर्चाता सहभागी झालेले काही विद्यार्थ्यांनी कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. यावेळी सुरक्षा रक्षक आणि विद्यार्थी यांच्यात वाद देखील झाला. दरम्यान या सर्व घटनेवर कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी ट्विटरवरून सांगितले की, विद्यार्थ्यांनी माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. घराची तोडफोड देखील केली. तसेच, पत्नीला कैद करुन ठेवले. मी एका मिटिंगमध्ये असताना अशा प्रकारे आंदोलन करणे योग्य आहे का? घरात महिला एकटी असल्याने तिला घाबरविणे चुकीचे असल्याचे कुमरा यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न

आम्ही कुलगुरुंची भेट घेऊन त्यांना काही प्रश्न विचारणार होते. पण त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. हे विद्यार्थी गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यासाठीच ते कुलगुरूंना भेटण्यासाठी गेले होते. पण आता आंदोलनाला हिंसक म्हणू्न बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे.


लिंबू सरबत पिण्याआधी 'हा' VIDEO एकदा पाहाचबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 07:43 AM IST

ताज्या बातम्या