JNU वाद : आरोपपत्र दाखल झाल्यानंतर उमर खालिदने दिलं मोदींना आव्हान

JNU वाद : आरोपपत्र दाखल झाल्यानंतर उमर खालिदने दिलं मोदींना आव्हान

आरोपपत्र दाखल झाल्यानंतर उमर खालिदने ट्वीट करत पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जानेवारी : "आम्ही कोर्टात निर्दोष असल्याचं सिद्ध करू पण तुम्ही राफेलप्रकरणी जेपीसी चौकशीला सामोरं जायला तयार आहात का," असं म्हणत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (JNU)विद्यार्थी उमर खालिद याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे.

दिल्लीतल्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) 9 फेब्रुवारी 2016 मध्ये देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 1200 पानांचं आरोपपत्र सोमवारी न्यायालयात दाखल केलं. कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य सहीत 10 जणांचा त्यात समावेश आहे. हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर उमर खालिदने ट्वीट करत पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं आहे.

'मोदीजी...आमच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राबाबत मी एवढंच सांगू इच्छितो की, आम्ही कायदेशीर लढाई लढण्यास आणि स्वत:चं निर्दोषत्व सिद्ध करण्यास तयार आहोत. पण तुम्ही राफेल घोटाळ्याप्रकरणी जेपीसी चौकशीसाठी तयार आहात का, किंवा किमान एखाद्या पत्रकार परिषदेला सामोरं जायला तरी तयार आहात का,' असं ट्वीट करत उमर खालिद याने मोदींवर निशाणा साधला आहे.काय आहे प्रकरण?

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 1200 पानांचं आरोपपत्र सोमवारी न्यायालयात दाखल केलं. या प्रकरणातल्या 10 आरोपींपैकी सात जण काश्मिरी तरुण आहेत. या प्रकरणी ABVPचे कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांना साक्षीदार म्हणून सादर करण्यात आलं आहे. उमर खालीदच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आरोपपत्रात आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली, आणि खलिद बशीर या सात काश्मिरी तरुणांसह 10 जणांना आरोपी करण्यात आलं आहे. त्याचबरोबर इतर 36 जणांचीही चौकशी करण्यात आली होती. मात्र त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळाले नाहीत.

9 फेब्रुवारी 2016मध्ये विद्यापीठात संसदेवरच्या हल्ल्यात दोषी असणारा अफजल गुरू याच्या फाशीच्या शिक्षेविरोधत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात देशविरोधी नारे लावल्याचा आरोप होता.


VIDEO : 'आता बोडक्याचं सांगणार' अजित पवारांचा भाजप मंत्र्यांवर घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2019 08:05 AM IST

ताज्या बातम्या