आता 'जेएनयू'त पौरोहित्य,योगा आणि वास्तुशास्त्र शिकवणार !

आता 'जेएनयू'त पौरोहित्य,योगा आणि वास्तुशास्त्र शिकवणार !

नुकतंच संस्कृत-इंडिक स्टडीज नावाचं नवीन अभ्यासकेंद्र जेएनयूमध्ये उघडण्यात आलं आहे. इथे पौरोहित्याचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

  • Share this:

13 एप्रिल: देशातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या  दिल्लीच्या  जवाहरलाल  नेहरू विद्यापीठात  आता पौरोहित्य ,योगा आणि वास्तुशास्त्राचे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.  संस्कृत या ज्ञानभाषेचा  व्यवसायासाठी वापर करता येईल या दृष्टीने हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

नुकतंच  संस्कृत-इंडिक स्टडीज नावाचं नवीन अभ्यासकेंद्र जेएनयूमध्ये उघडण्यात आलं आहे. इथे पौरोहित्याचा  पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.  तसंच वास्तुशास्त्रात एम. ए  योगात एमए तर आयुर्वेदात बीएससीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.  याशिवाय संस्कृत पत्रकारितेचा अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे.यामुळे संस्कृतला संजीवनी मिळेल अशी  आशा विभागप्रमुख गिरीश नाथ झा यांना आहे.  याशिवाय धार्मिक  पर्यटनातील नवीन अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे.

आतापर्यंत पौरोहित्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. तसंच  पौरोहित्य फक्त पाठशाळांमध्ये शिकवलं जातं होतं. पण आता मात्र पौरोहित्याचा अभ्यासक्रम  सर्व जातींसाठी खुला होणार असून हा अभ्यासक्रम शिकणारे कुणीही व्यावसायिक  पंडीत होऊ शकतील असं देखील झा यांनी सांगितलं. या अभ्यासक्रम वेदातील श्रुती आणि स्मृतीमधील वेगवेगळी सुक्त शिकवली जाणार आहे. याशिवाय कल्पांग वेदांतातही एक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

याआधी आयआयटी खरगपूरमध्येही अशाच प्रकारे वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. पुर्वापार  धर्म नाकारणाऱ्या डाव्या विचारांच्या पुरोगामी मानल्या जाणाऱ्या जेएनयूमध्ये आता धार्मिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. याचा परिणाम काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: April 14, 2018, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading