JNUच्या विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन टॅक्सी ड्रायव्हरचा बलात्कार

तरुणीने मंदिर मार्ग या ठिकाणावरून घराकडे जाण्यासाठी टॅक्सी केली. नंतर काही वेळाने टॅक्सी ड्रायव्हरने तीला काही खाण्यासाठी दिले आणि तिला गुंगी आल्यावर बलात्कार केला.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 08:09 PM IST

JNUच्या विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन टॅक्सी ड्रायव्हरचा बलात्कार

नवी दिल्ली 5 ऑगस्ट : राजधानी दिल्लीत बलात्काराच्या घटनेनं खळबळ उडालीय. JNUच्या व्दितीय वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर टॅक्सी ड्रायव्हरनेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. तीला गुंगीचं औषध देऊन त्याने हे कृत्य केल्याची माहितीही पुढे आलीय. त्यामुळे दिल्लीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पोलीस त्या कॅब ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.

पीडीत तरुणी आपल्या मित्राच्या घरून परतत असताना ही घटना घडली. तरुणीने मंदिर मार्ग या ठिकाणावरून घराकडे जाण्यासाठी टॅक्सी केली. नंतर काही वेळाने टॅक्सी ड्रायव्हरने तीला काही खाण्यासाठी दिले. नंतर आपल्याला गुंगी आल्याचं तीने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलंय. दक्षिण दिल्लीतल्या एका पार्कजवळ ती तरुणी अर्धबेशुद्धावस्थेत सापडली.

लष्कर आणि हवाई दल 'हाय अलर्ट'वर, काश्मिरात पाकिस्तान कुरापत काढणार?

स्थानिक लोकांनी तीला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी जेव्हा तिची तपासणी केली तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. या तरुणीला गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप करण्यात येतोय. ही मुलगी पश्चिम उत्तर प्रदेशातली असून JNUच्या हॉस्टेलमध्ये राहते. परदेशी भाषा विभागात ती शिकत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. तिने ही माहिती वॉर्डनला सांगितली आणि नंतर पोलीस तक्रार करण्यात आली.

कलम 370चा काँग्रेसला झटका, विरोध केल्यानं या ज्येष्ठ नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

Loading...

या आधीही दिल्लीत अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. घटना घडल्यानंतर प्रत्येक वेळी सरकार उपाययोजना करण्याच्या घोषणा करते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. दिल्लीत उत्तर प्रदेशातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर टॅक्सी ड्रायव्हर्स येत असतात. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेकांचा समावेश आहे. मात्र त्यांची पडताळणी होत नसल्याने अनेक समाजकंटक त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे देशाची राजाधानी असलेल्या दिल्लीत महिलांच्या सुरक्षेवर कायम प्रश्नचिन्ह लागलेलं असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...